राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊसाची शक्यता

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

शनिवार पासून राज्याच्या काही भागांत पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्‍यता वेधशाळेने वर्तवली आहे. राज्यातील काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज आहे. 

पणजी: राजधानी पणजीसह राज्याला आज संध्याकाळी मेघगर्जनेसह पावसाने झोडपून काढले. दुपारपासूनच आकाशात काळ्या ढगांची दाटी जाणवत होती व उष्माही वाढला होता. त्यानंतर जोरदार वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले ते मध्यरात्रीपर्यंत कायम होते.

राज्यभरात आज विजेच्या लखलखाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या असून उद्या शनिवार (ता. १२) पासून राज्याच्या काही भागांत पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्‍यता वेधशाळेने वर्तवली आहे. राज्यातील काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज आहे. 

राज्यात गेल्या काही दिवसांपासून क्वचितच पावसाची एखादी सर कोसळत आहे; मात्र आज संध्याकाळी ढग दाटून आले होते. राज्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी हलक्‍या सरी पडल्या. पणजी, म्हापसा, काणकोण परिसरात जोरदार पाऊस झाला.

पणजीत आज २९ अंश सेल्सिअस कमाल तर २५.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. संध्याकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. तो रात्री कायम होता. मध्‍यरात्रीच्‍या दरम्‍यान सुमारे तासभर जोरदार पाऊस पडला. 

सिंधुदुर्ग, बेळगाव येथेही जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. त्‍यामुळे तेथील जनजीवनावरही परिणाम झाला. काही ठिकाणी पूर आले. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या