राज्यात आज मुसळधार पाऊसाची शक्यता

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

आज दिवसभरात केपे येथे सर्वाधिक १० सेंमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. याशिवाय वेधशाळेने नैऋत्य मोसमी वारे अरबी सुमद्रात ४५ ते ५५ किलो मी. प्रति तास वेगाने वाहतील, असे म्हटले आहे.

पणजी: राज्य हवामान वेधशाळेने १७ तारखेपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील, असाही वेधशाळेने अंदाज व्यक्त केला आहे. आत्तापर्यंत राज्यात १४२ इंच एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. 

आज दिवसभरात केपे येथे सर्वाधिक १० सेंमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. याशिवाय वेधशाळेने नैऋत्य मोसमी वारे अरबी सुमद्रात ४५ ते ५५ किलो मी. प्रति तास वेगाने वाहतील, असे म्हटले आहे.

आज महत्त्वाच्या ठिकाणी नोंद झालेला पाऊस (सेंमीमध्ये) : केपे १०, सांगे व मडगाव प्रत्येकी ७, पणजी, साखळी आणि जुने गोवे प्रत्येकी ५, दाबोळी ४, पेडणे, फोंडा, काणकोण, मुरगाव व म्हापसा प्रत्येकी ३.

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या