राज्यात धुव्वाधार पाऊस ; ‘स्मार्ट सिटी’ पुन्हा पाण्याखाली

हवामान खात्याने सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट बजावला आहे.
राज्यात धुव्वाधार पाऊस ; ‘स्मार्ट सिटी’ पुन्हा पाण्याखाली
Monsoon in Goa | Goa Rain UpdatesDainik Gomantak

पणजी : हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात गुरुवारी धुव्वाधार पाऊस बरसला. गुरुवारी सकाळी साडेसात वाजेपर्यंत संपलेल्या 24 तासांत राज्यात सरासरी 37.6 मिमी. पावसाची नोंद झाली असली तरी गुरुवारी सकाळपासूनच पावसाने जोर धरला. दुपारी केवळ दोनच तासांत सुमारे 60 मिमी. पावसाची नोंद झाली. त्यामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळित होऊन वाहतुकीवरही विपरित परिणाम झाला. पुढील दोन दिवसही असाच मुसळधार पाऊस पडणार असून हवामान खात्याने सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट बजावला आहे. (Monsoon in Goa)

Monsoon in Goa | Goa Rain Updates
'महामार्गावरील दारूच्या दुकानांचे परवाने रद्द न केल्यास उच्च न्यायालयात धाव घेणार'

दोन तासांत 59 मिमी. पाऊस

गोवा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी 11 ते 1 या दोन तासांत पणजी शहरात 59 मिमी. पावसाची नोंद झाली. राज्याच्या मध्य भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राजधानी पणजीला पावसाचा तडाखा बसला. केवळ दोन तासांत मुसळधार पाऊस पडल्याने शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.

पणजीत गटारे साफसफाईचे नियोजनच केलेले नाही. महापालिकेकडे कर्मचाऱ्यांची कमतरता नाही, पण ते काम कुठे करतात तेच कळत नाही. मे महिन्यात आयुक्त, महापौर, मुख्य अभियंता रजेवर होते.

- उदय मडकईकर, माजी महापौर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com