पावसाचा जोर कायमच, राज्यात 'यलो अलर्ट'

राज्यात सोमवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहील. त्यामुळे पुन्हा यलो अलर्ट वाढविण्यात आला आहे.
पावसाचा जोर कायमच, राज्यात 'यलो अलर्ट'
Goa Weather: Heavy rain in goa yellow alert in GoaDainik Gomantak

राज्यात सोमवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहील. त्यामुळे पुन्हा यलो अलर्ट (yellow alert in Goa) वाढविण्यात आला आहे. गुरुवारी राज्याच्या काही भागांत पावसाने उसंत घेतली. मात्र, काणकोण, केपे, सांगे, पेडणे, डिचोली याठिकाणी पावसाने हजेरी लावली.

कोकणातही पावसाचा जोर वाढला असून सावंतवाडी परिसराला पावसाने झोडपून काढले आहे . गोव्यातही पावसाचा जोर वाढणार असून वादळी वाऱ्याचीही शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी राज्यात केवळ ०.१ मि.मी. पावसाची नोंद झाली. शुक्रवारी पहाटे वातावरणात गारवा असेल, तसेच धुकेही पडेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. (IMD issues yellow alert in Goa.)

तर दुसरीकडे राज्यात अवकाळी पावसामुळे संसर्गजन्‍य आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे सर्दी, खोकला आणि तापाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पावसाच्या साठणाऱ्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्यानेही आजार वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

सध्या राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाचा जोर वाढला आहे. त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावरही होत आहे. विविध आजारांना हे वातावरण निमंत्रण देत आहे. त्यामुळे पणजीसह विविध शहरे आणि ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढत आहे. गोमेकॉमध्येही रुग्णांची संख्या वाढली असून, दररोज शेकडो रुग्णांवर उपचार केले जात आहेत. विशेषतः सर्दी, खोकला आणि ताप या लोकांच्या आरोग्य विषयक समस्या आहेत.

Goa Weather: Heavy rain in goa yellow alert in Goa
महागाईविरोधात काँग्रेस आक्रमक, राज्यभर ‘म्हारगायचों जागोर’ अभियान

पावसाची हजेरी कायम राहिल्यास राज्यात संसर्गजन्‍य आजार वाढण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. परिसरात साचून राहणाऱ्या‍ पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढतो आणि आजार बळावतात. ते सुरुवातीला सामान्य वाटत असले तरी, त्यातून न्यूमोनिया, डेंग्यू, चिकनगुनिया अशा आजारांचा प्रसार होण्याची भीती आहे. त्यामुळे आरोग्य खात्याकडून जागृती केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com