नैऋत्य मान्सून सक्रिय, मच्‍छीमारांना इशारा

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास पणजी शहर परिसरात पावसाच्या हलक्या सरींचा शिडकाव झाला. त्यामुळे रात्रीच्या हवेत गारवा निर्माण झाला

पणजी: दक्षिण-पश्चिम तथा नैऋत्य दिशेला मान्सून सक्रिय झाल्याने गोव्यात पुढील आठवड्यात हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळतील, असा वेधशाळेने अंदाज व्यक्त केला आहे. रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास पणजी शहर परिसरात पावसाच्या हलक्या सरींचा शिडकाव झाला. त्यामुळे रात्रीच्या हवेत गारवा निर्माण झाला. 

पेडणे तालुक्‍यात गडगडाटासह जोरदार पाऊस पडला.  ७ ते ९ या तीन दिवसांत समुद्र खवळलेला असेल. त्‍यामुळे मच्छीमारांनी खोलवर समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. त्‍याचबरोबर १८ ते २३ सप्‍टेंबर या कालावधीत वादळी वाऱ्यासह पाऊस येण्‍याची शक्‍यता वेधशाळेने वर्तवली आहे. त्‍यामुळे समुद्राच्‍या लाटा उंच उसळण्‍याची शक्‍यता आहे. किनारपट्टीतील लोकांनीही सावधगिरी बाळगावी, असा इशारा दिला आहे. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या