सत्तरी तालुक्यात पावसाची दिवसभर संततधार

प्रतिनिधी
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

सत्तरी तालुक्यात आज सोमवारी दिवसभर पावसाने संततधार धरली होती. त्यामुळे विविध नद्यांना मोठे पाणी आले होते. 

वाळपई:  सत्तरी तालुक्यात आज सोमवारी दिवसभर पावसाने संततधार धरली होती. त्यामुळे विविध नद्यांना मोठे पाणी आले होते. 

   वाळपई वेळूस येथील वेळूस नदीच्या पात्राचा पाण्याचा मोठा प्रवाह आला होता. त्यामुळे वेळूस नदी पूर्ण क्षमतेने वहात होती. या संततधार मुसळधार पावसामुळे लोकांना कामासाठी बाहेर पडणे जमले नाही. तसेच कुळागरातील कामे करण्यास अडथळा आला होता. या दिवसात बागायतदार वर्ग दररोज सुपारी गोळा करण्याची कामे करीत असतो. या मुसळधार पावसामुळे या कामात व्यत्यय आला होता. मोर्ले, बिंबल, केरी चोर्लाघाटात रस्त्यावर झाडे कोसळण्याचे प्रकार घडले. वाळपई अग्निशमनच्या जवानांनी सर्व ठिकाणी जाऊन रस्त्यावरील कोसळलेली झाडे हटविली. दुपार नंतर तर पावसाचे मोठा जोर धरला होता. 

आज पहाटे पासूनच पावसाने जोरदारपणे कोसण्यास सुरुवात केली होती. या पावसामुळे जनजीवनावर देखील परिणाम दिसून आला. वाळपई बाजारात लोकांची हजेरी आज कमी दिसून आली. स्वयंसेवा भांडारात ग्राहकांची गर्दी नव्हती. मुसळधार पावसाने नागरिकांची बरीच तारांबळ उडाली होती. 

संबंधित बातम्या