काणकोणात वादळी पावसाचा तडाखा सुरूच

Subhash Mahale
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

काणकोणात वादळी पावसाचा कहर सुरूच आहे. त्याचबरोबर समुद्राला उधाण आल्याने पाळोळे, आगोंद व अन्य किनारी भागातील पर्यटन आस्थापनांना जबर फटका बसला आहे. एका बाजूला गेला पर्यटन हंगाम कोरोनामुळे नुकसानीत गेला आहे, तर आता वादळी पाऊस व समुद्राच्या तुफानी लाटांनी पर्यटन आस्थापने आपल्या कवेत घेतली आहेत.

काणकोण

पाळोळे किनाऱ्यालगतची सुमारे दहा आस्थापने तुफानी लाटांच्या माऱ्यामुळे वाहून गेली आहेत. ओव्हरे किनाऱ्याची मोठ्या प्रमाणात झीज होऊन किनाऱ्यालगतची पर्यटन अस्थापने कोसळली आहेत, असे स्थानिक नगरसेवक दयानंद पागी यांनी सांगितले.
येथील माजी नगराध्यक्ष राजेंद्र देसाई यांच्या अन्य पर्यटन व्यावसायिकांना या वादळामुळे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे.

संपादन - यशवंत पाटील

संबंधित बातम्या