सावईवेरेत पावसामुळे जनजीवन विस्कळीत

प्रतिनिधी
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

सप्टेंबर महिना सरत असताना गेले तीन चार दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे सावईवेरे, वळवई, केरी या पंचायत क्षेत्रातील जनजीवन विस्कळीत झाले आहे . या भागात दिवसापेक्षा रात्रीचाच जास्त पाऊस पडत असल्याने त्यातल्यात्यात लोक समाधान मानत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे या भागातील ओहोळ व नाले भरून वाहत आहेत. 

सावईवेरे: सप्टेंबर महिना सरत असताना गेले तीन चार दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे सावईवेरे, वळवई, केरी या पंचायत क्षेत्रातील जनजीवन विस्कळीत झाले आहे . या भागात दिवसापेक्षा रात्रीचाच जास्त पाऊस पडत असल्याने त्यातल्यात्यात लोक समाधान मानत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे या भागातील ओहोळ व नाले भरून वाहत आहेत. 

वळवई व वाघुर्मे गावात पुरदर्शक स्थिती निर्माण झाली असली तरी धोक्याची पातळी गाठलेली नाही. पाऊस थांबताच पुराचे पाणी ओसरले जाते. वळवईत पुराची पातळी वर आल्यास फेरीबोटी बंद ठेवाव्या लागतात. मग प्रवाशांचे हाल होत असतात. यासाठी या भागात पुलाची मागणी गेली पन्नास वर्षे केली जात आहे. पण आजपर्यंत कोणत्याही सरकारने त्याची दखल घेतली नाही. एका सरकारने पुलाच्या कामास प्राथमिक स्तरावर काम चालू केल्यास दुसरे सरकार ते काम बंद पाडून नव्याने दुसरीकडे कामास प्रारंभ करण्याचे नाटक करते यामुळे या भागातल लोकांच्या नशिबी होड्या व फेरीबोट या साधनांचाच वापर करावा लागतो. कावंगाळ सावईवेरे भागातून वाहणारा ओहोळ केरीतील वैजारीमधून सुरु होतो. त्यामुळे या ओहोळाच्या पुराची पातळी नेहमीच पावसाळ्यात वाढत असते. यामुळे कावंगाळ भागात तसेच वाघुर्मे भागातील घरांना धोका निर्माण होत असतो.  आठ-दहा वर्षांपूर्वी पावसाळ्यात सतत पुराचे सावट या परिसरात पसरत असे. 

ओढ्याचेपाणी नदीच्या पाण्यात सामावले जात नसल्याने ते माघारी फिरून कावंगाळ, वाघुर्मे गावातील शेतीत पसरत असे. शिवाय अनंत देवस्थानच्या प्राकारातही भरत असे. पण रेती व्यवसायामुळे गेली आठ दहा वर्षे सुरक्षितता होती. पण रेती व्यवसायास पुन्हा बंद झाल्याने पुराची स्थिती डोके वर काढत आहे. रेती व्यवसाय शाप की वरदान अस म्हटल्यास तो व्यवसाय या भागाला वरदानच  आहे असे म्हणावे लागेल.

संबंधित बातम्या