Heavy rains expected in Goa from May 15 to 17
Heavy rains expected in Goa from May 15 to 17

गोवेकरांनो सावधान! चक्रीवादळामुळे गोव्यात जोरदार पावसाची शक्यता

पणजी: अरबी समुद्रात (Arabian Sea) निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाच्या (Clyclone) प्रभावाने गोव्यात (Goa) जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने गोमंतकीयांनी सतर्क राहावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Babu Ajgaokar) यांनी केले आहे.  समुदात मासेमारीसाठी उतरलेल्या मच्छिमारांना किनाऱ्यावर परतण्याची सूचना हवामान खात्याने केली आहे. मच्छिमारांची सुरक्षा महत्त्वाची असून, त्यांनी हवामान खात्याच्या सूचनेनुसार त्वरित किनाऱ्यावर परत यावे असे आवाहन आजगावकर यांनी केले आहे.(Heavy rains expected in Goa)

कोरोना संकटाचा आम्ही सगळे मिळून मुकाबला करत असताना अरबी समुद्रात वादळ घोंगावत आहे. वादळाचा प्रभाव तामिळनाडू,  केरळ, कर्नाटक,  महाराष्ट्र व गुजरात या किनारी राज्यांना जाणवणार आहे. हे चक्रीवादळ अरबी समुद्रात उत्तरेकडे सरकून गुजरात व पाकिस्तानात धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्ववभूमीवर गोव्यात जोरदार वाऱ्यासह  पावसाची शक्यता आहे.

चक्रीवादळ येण्याची कारणे काय आहेत ?
अरबी समुद्राच्या आग्नेय भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने लक्षद्वीप आणि केरळच्या किनारपट्ट्यांवर चक्रीवादळ निर्माण होऊन त्या वादळाचा जोर वाढत जाणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. 15 ते 17 मे दरम्यान दक्षिण कोकण व गोव्याच्या किनारी भागात  या वादळाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमध्ये  सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. 

दरम्यान, या वादळामुळे मुंबई आणि ठाण्याच्या काही भागात तसेच रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याने हाय अलर्ट लागू करण्यात वाले असून, नागरिकांनी देखील सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. 
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com