गोव्यात आज जोरदार पावसाची शक्यता

दैनिक गोमंतक
बुधवार, 9 जून 2021

पाऊस चांगला राहील असे वाटल्यानंतर शेतकरी पेरणीकडे वळले आहेत....

पणजी: मॉन्सूनचे (Monsoon) आगमन होऊन 48 तास उलटले असले तरी पावसाने (Rain) म्हणावा तसा जोर पकडलेला नाही. पावसाची दिवसभरात एखाद दुसरी जोरदार सर येत असली तरी आकाश मात्र दिवसा बहुतांशवेळा निरभ्रच असते. (Heavy rains expected in Goa today)

पणजी (Panjim) वेधशाळेने आज जारी केलेल्या हवामान पत्रकात नमूद केल्यानुसार 9 मे रोजी राज्यात एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळू शकतो. पावसाळी दिवसाची सकाळ उजाडावी असे वातावरण नसते. मध्येच काळे ढग दाटून येतात आणि पाऊस पडतो व पुन्हा ऊन डोकावू लागते असा ऊन-पावसाचा पाठशिवणीचा खेळ सुरू आहे की काय, असे वाटू लागते. पाऊस कायम पडत राहील असे वाटल्यानंतर शेतकरी पेरणीकडे वळेल असे दिसते. सध्या मशागती अनेक ठिकाणी सुरू झाल्या आहेत.

''मॉन्सून म्हणजे पाऊस नव्हे'' 

संबंधित बातम्या