गोव्यात आज, उद्या मुसळधार पावसाची शक्यता

प्रतिनिधी
रविवार, 27 सप्टेंबर 2020

राज्यात २७ आणि २८ रोजी मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता गोवा वेधशाळेने व्यक्त केली आहे. आज म्हणजेच २६ रोजीही राज्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी कमी प्रमाणात पाऊस पडला.

पणजी: राज्यात २७ आणि २८ रोजी मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता गोवा वेधशाळेने व्यक्त केली आहे. आज म्हणजेच २६ रोजीही राज्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी कमी प्रमाणात पाऊस पडला. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील सरासरी तापमानात चांगलीच घेत झाली आहे. त्यामुळे वातावरणात थंडावा जाणवतो. गेल्या चोवीस तासात कमीत कमी २७ अंश सेल्सिअस आणि जास्तीत जास्त २४ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. वाऱ्याचा वेग गेल्या काही दिवसांच्या तुलनेत कमी झाला आहे.

या हंगामात आतापर्यंत सरासरी ४१३०.१ मि.मी इतका पाऊस पडला आहे तर सामान्य पावसाची मर्यादा २९३७.४ मि. मी इतकी आहे. या हंगामात पडलेला पाऊस हा सामान्य पावसापेक्षा ४२ टक्क्यांनी अधिक आहे. गोवा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत सरासरी १६० इंच इतक्या पावसाची नोंद झाली होती. सध्याचा पाऊस हा वातावरणीय बदलाचा परिणाम आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासात म्हापसा येथे ०६३.५ मि. मी., पेडणे येथे ०४५.८ मि. मी., जुने गोवा येथे ०७०.५ मि. मी., साखळी येथे ०५२.४ मि. मी., वाळपई येथे ०४८.२ मि. मी., काणकोण येथे ०६७.२ मि. मी., दाबोळी येथे ०२४.६ मि. मी., मडगाव येथे ०७५.३ मि. मी., मुरगाव येथे ०१३.८ मि. मी., केपे येथे ०९०.० मि. मी. आणि सांगे येथे ११५.६ मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

संबंधित बातम्या