Goa Rain Updates: आज मुसळधार पावसाची शक्यता
Goa Rain UpdatesDainik Gomantak

Goa Rain Updates: आज मुसळधार पावसाची शक्यता

सत्तरी तालुक्यात तब्बल 5.9 इंच पावसाची नोंद झाली असून रगाडा नदीवरील पैकुळ गावाला जोडणारा मुरमुणे पूल पाण्याखाली गेला होता.

पणजी: राज्यात (Goa) आज मंगळवारी मुसळधार पावसाची (Rain Update) शक्यता हवामान वेधशाळेने वर्तविली आहे. सोमवारी राज्याच्‍या अनेक भागांना पावसाने झोडपून काढले. सत्तरी तालुक्यात तब्बल 5.9 इंच पावसाची नोंद झाली असून रगाडा नदीवरील पैकुळ गावाला जोडणारा मुरमुणे पूल पाण्याखाली गेला होता.

Goa Rain Updates
पावसाच्या व्यत्ययामुळे तिळारीच्या दुरुस्तीत अडथळा

सोमवारच्या पावसाने राज्यात पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. सोमवारी सकाळपासून मेघ दाटून आले होते. सकाळच्या प्रहरात राज्याच्या विविध भागांत तासभर पावसाने

हजेरी लावली. दमट वातावरणामुळे दिवसभर पर्जन्यसदृश स्थिती होती. दुपारनंतर काही भागात पावसाने उसंत दिली. मात्र, सत्तरी, वाळपई, साखळी आणि केपे परिसरात पावसाची दिवसभर रिपरिप सुरू होती. मंगळवारी ‘यलो अलर्ट’ कायम असून मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com