गोवा, कोकणात बुधवारपर्यंत अतिवृष्टी

तेजश्री कुंभार
रविवार, 2 ऑगस्ट 2020

राज्यात पावसाबाबतचे संमिश्र पद्धतीचे वातावरण होते. परंतु गोव्यासह संपूर्ण कोकणात पुढच्या चार-पाच दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्‍यता आहे.

पणजी

राज्यात

आज पावसाबाबतचे संमिश्र पद्धतीचे वातावरण होते. परंतु गोव्यासह संपूर्ण कोकणात पुढच्या चार-पाच दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्‍यता आहे. गोवा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, २ ते ५ ऑगस्ट रोजी राज्यात पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
गेल्या चोवीस तासात राज्यात कमीत कमी २३ अंश सेल्सीअस आणि जास्तीत जास्त २९ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली आहे.
गोवा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, पेडणे येथे ००५.४ मि. मी., पणजी येथे ०२३.८ मि. मी., जुने गोवा येथे ००७.५ मि. मी., साखळी येथे ००८.८ मि. मी., वाळपई येथे ०१६.९ मि. मी., काणकोण येथे ०२२.२ मि. मी., दाबोळी येथे ०६३.८ मि. मी., मडगाव येथे ०२७.१ मि. मी., मुरगाव येथे ०४२.२ मि. मी., केपे येथे ०२४.४ मि. मी., सांगे येथे ०२३.० मि. मी. पावसाची नोंद झाली.
समुद्रकिनारी वाऱ्याचा वेग ४० ते ५० कि. मी. प्रति तास असल्याने समुद्रानजिक न जाण्यासाठीचा इशारा मासेमाऱ्याना आणि लोकांनाही देण्यात आला आहे. गोवा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार लाटांचा वेग आणि उंची अधिक असणार आहे.
दरम्यान, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत बुधवार (ता. ५) पर्यंत सलग मोठ्या पावसाची शक्‍यता आहे. मुंबई, ठाणेत बुधवारपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. अतिवृष्टीची शक्‍यता लक्षात घेऊन वेधशाळेने सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याची सूचना केली आहे.

संपादन ः संजय घुग्रेटकर GOA GOA GOA

संबंधित बातम्या