डिचोलीत पावसाचा कहर, जनजीवन झाले विस्कळीत

सकाळ ते दुपारपर्यंत पावसाची संततधार चालूच होती. दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा निवळला होता.
डिचोलीत पावसाचा कहर, जनजीवन झाले विस्कळीत
AgricultureDainik Gomantak

डिचोली: गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरु झालेल्या पावसाने पुन्हा कहर केला आहे. काल रात्रीपासून पावसाने जोर धरला असून, आज बुधवारी तर डिचोलीत (Bicholim) सर्वत्र दुपारपर्यंत जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. सकाळ ते दुपारपर्यंत पावसाची संततधार चालूच होती. दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा निवळला होता. तरीदेखील दिवसभर अधूनमधून ढगाळ वातावरण दिसून येत होते. दरम्यान, कालपासून पडणाऱ्या पावासाचा जोर असाच चालू राहिल्यास पावसाच्या तडाख्यात भातशेतीची यंदाही नाशाडी अटळ आहे. त्यामुळे बळीराजा चिंताक्रांत बनला आहे.

Agriculture
Goa: मुख्यमंत्र्यांनी डिचोली पोलिस स्थानकातील गणरायाचे घेतले दर्शन

जनजीवनावर परिणाम

चतुर्थी काळात जोरदार वृष्टी केल्यानंतर गेल्या जवळपास पंधरा दिवसांपासून पावसाचा जोर बराच कमी झाला होता. हवामान वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार कालपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. आज बुधवारी सकाळपासून ते दुपारपर्यंत पावसाची संततधार चालूच होती. पावसामुळे आज दिवसभर जनजीवनावर मोठा परिणाम जाणवला. पावसामुळे आज डिचोलीत विविध भागात वाहतूक कोंडीच्या घटनाही घडल्याची माहिती मिळाली आहे. मात्र सायंकाळपर्यंत कोणतीही विपरीत घटना घडली नसल्याची माहिती अग्निशमन दलाकडून मिळाली. पावसामुळे नद्यांचे पाणी किंचित वाढले असले, तरी कोणताही धोका नाही.

Agriculture
Goa: डिचोली येथे रस्त्याच्या बाजूला बसलेल्या विक्रेत्यांना हुसकावले

आठवडी बाजार विस्कळीत

डिचोलीत बुधवारी आठवडी बाजार भरला होता. मात्र सकाळी जोरदार पाऊस पडल्याने सकाळीच बाजार विस्कळीत झाला होता. त्यामुळे आठवडी बाजारावर दुपारपर्यंत परिणाम झाल्याचे जाणवत होते. ग्राहकांची वर्दळ कमी होती. पावसामुळे गेल्या आठवडी बाजाराचा बेरंग झाला होता. त्याचीच पुनरावृत्ती आजच्या आठवडी बाजारात दिसून आली.

भातशेती धोक्यात

डिचोलीतील विविध भागातील भातशेतीला कणसे धरली आहे. हळदणवाडी-मये आदी काही भागात शेती पिकण्याच्या वाटेवर आहेत. मात्र आता पावसाने डोके वर काढल्याने शेतकरी अस्वस्थ बनले आहेत. पावसाची वक्रदृष्टी चालूच राहिली, तर भातपिकाची नासधूस होण्याची भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत. आधीच यंदा भातशेती समाधानकारक बहरलेली नाही. त्यातच आता पावसाचे संकट, त्यामुळे यंदाही भातपिक धोक्यात येण्याची भिती मये येथील शेतकरी काशिनाथ मयेकर आणि धुमासेतील शेतकरी भिसो नाईक यांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.