Ganesh Chaturthi: डिचोलीत जोरदार पर्जन्यवृष्टी, गणपती विसर्जनाच्या उत्साहावर पावसाचे विरजण

डिचोलीतील काही भागांत सात दिवसांच्या गणपतींच्या विसर्जनाची लगबग सुरू असतानाच, गणेशभक्तांच्या उत्साहावर पावसाचे विरजण पडले.
Heavy rains in goa
Heavy rains in goaDainik Gomantak

डिचोली: डिचोलीतील काही भागांत सात दिवसांच्या गणपतींच्या विसर्जनाची लगबग सुरू असतानाच, गणेशभक्तांच्या उत्साहावर पावसाचे विरजण पडले. मंगळवारी सायंकाळी जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने धुमासेसह साळ आदी काही भागात गणेशमूर्ती विसर्जनात अडथळा निर्माण झाला. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये काहीसा निरुत्साह पसरला.

(Heavy rains in Bicholim, rain fades on the excitement of Ganapati immersion)

Heavy rains in goa
Ganesh Chaturthi: कुंभारजुवेत रंगला सांगोडोत्सव

यंदा दीड आणि पाच दिवसांच्या गणपती विसर्जनावेळी पावसाने कृपा केली होती. त्यामुळे डिचोलीतील बहूतेक भागात दीड आणि पाच दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन सुरळीतपणे पार पडले होते.

मंगळवारी सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण होवून पावसाची बरसात सुरु झाली. सायंकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान, तर पावसाचा जोर काहीसा वाढला. त्यामुळे गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याच्या तयारीत असलेले गणेशभक्त काहीसे चिंताग्रस्त बनले. पावसाचा जोर काहीसा कमी होताच धुमासे येथील गणेशभक्तांनी 7.30 वाजण्याच्या सुमारास पारंपरिक नदीवर गणपती बाप्पाचे विसर्जन केले तर साळ येथील विसर्जन काहीसे लांबणीवर पडले. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पाऊस ओसरल्यानंतर गणपतीच्या मूर्ती विसर्जनासाठी घराबाहेर काढण्यात आल्या.त्यानंतर मात्र वाजत-गाजत मिरवणुकीने गणपती विसर्जन करण्यात आले. त्यात अबालवृद्धांचा सहभाग होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com