Chorla Ghat : चोर्ला घाटातून बंदी असतानाही अवजड वाहतूक सुरुच

कर्नाटक आणि गोवा राज्यातील समन्वयाचा अभाव यातून दिसून आला असून कर्नाटकमधून गोव्यात अवजड वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
Chorla Ghat
Chorla GhatDainik Gomantak

Chorla Ghat : चोर्ला घाटातून बंदी असतानाही अवजड वाहतूक सुरुच असल्याचं चित्र आता समोर आलं आहे. गेल्या आठवड्यात उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे यांनी चोर्ला घाटातून सुरु असलेल्या अवजड वाहतुकीवर निर्बंध लादले होते. पुढील 6 महिन्यांसाठी चोर्ला घाटातून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली होती. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्याचं आता दिसून आलं आहे. कर्नाटक आणि गोवा राज्यातील समन्वयाचा अभाव यातून दिसून आला असून कर्नाटकमधून गोव्यात अवजड वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

साखळी ते चोर्ला घाटपर्यंतचा रस्ता अरुंद असून येथे अवजड वाहनांना परवानगी दिल्यास वाहतूक कोंडी होऊ शकते. शिवाय या मार्गावर अवजड व्यावसायिक वाहनांच्या अपघाताची शक्यता असल्याचा अहवाल वाहतूक पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे येथून अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी घालण्याचा आदेश जारी करण्यात आहे आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे यांनी सांगितले, की दत्तवाडी-साखळी जंक्शन ते चोर्ला घाट (गोवा हद्द), साखळी प्राथमिक आरोग्य केंद्र जंक्शन ते चोर्ला घाट (गोवा हद्द), होंडा जंक्शन ते चोर्ला घाट (गोवा हद्द) या मार्गावरून अवजड वाहनांना 19 मार्च 2023 पर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

Chorla Ghat
Gomantak Exclusive: दक्षिण गोव्यात ड्रग्स पेडलर मोकाट; गोवा पोलिसांची नाचक्की!

गोवा-बेळगाव मार्गावरील चोर्ला घाटात अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसत आहे. आज रविवारी कुणकुंबी येथील चेकपोस्टजवळ अपघात होऊन दुचाकीवरील काशिनाथ प्रकाश गावडे (23, रा.चिगुळे, कर्नाटक) याचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेला महेश रामचंद्र गावडे (29) हा गंभीर जखमी झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, काशिनाथ आणि महेश गावडे हे दोघे चुलत भाऊ हणजूण येथील एका रिसॉर्टमध्ये काम करायचे. गणेश चतुर्थीसाठी दोघेही गावी गेले होते. गोव्याकडे येत असताना कुणकुंबी येथील चेकपोस्टजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात गाडी चालवत असलेला काशिनाथ जागीच ठार झाला. तर जखमी झालेल्या महेशला उपचारासाठी बेळगावमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घाटातील रस्त्यावर काही ठिकाणी खडी पसरल्याने वाहने घसरत आहेत. शिवाय पावसामुळे पडत असलेल्या धुक्यामुळे रस्ताही अस्पष्ट दिसतो. यापूर्वीच एका धोकादायक वळणावर कार-ट्रकचा अपघात झाला होता. या अपघातामुळे येथील वाहतून अर्था तास ठप्प झाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com