Goa Tourism Department: पर्यटन खात्याचा हेली जॉय राईड्स उपक्रम नेमका आहे तरी काय?

पर्यटकांसाठी 27 जानेवारीपासून हेली जॉय राईड्स उपक्रम सुरू होणार आहे.
Goa Tourism Department|Flight Ride
Goa Tourism Department|Flight RideDainik Gomantak

Goa Tourism Department: कोरोना महामारीच्या काळानंतर गोव्याच्या पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी पर्यटन खात्याने विविध उपक्रम सुरू केले आहेत. याचा भाग म्हणून हेली जॉय राईड्स उपक्रम सुरू होणार असून पर्यटकांना राज्यातील निसर्गरम्य सौंदर्याचा थरारक अनुभव घेता येईल.

उपक्रमाअंतर्गत प्रवाशांना दहा मिनिटांसाठी जॉय राईड्स घेतला येईल. उपक्रमाचे उद्‍घाटन शुक्रवारी 27 जानेवारी रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्याहस्ते होणार आहे.

सकाळी 11 वा. ते दुपारी 12 वा. आणि दुपारी 3 वा. ते सायंकाळी 4 वा. दरम्यान 50 मिनिटे राईड असणार असून प्रत्येकी पाच राईड्स होणार आहे. डिसेंबरमध्ये राईड्स प्रायोगिक तत्त्वांवर सुरू केली गेली होती. आता अधिकृतपणे सुरू होणार आहे. लवकरच आणखी एक हेलिकॉप्टर विक्री करण्याचा विचार सुरू आहे.

तिकीट खरेदीसाठी कंपनीचे हॉक एव्हीएशन.इन संकेतस्थळावर, गोवा पर्यटन विकास महामंडळ (जीटीडीसी), राज्यातील ट्रव्हल एजंट यांच्याकडे उपलब्ध असणार आहे, असे केसम यांनी सांगितले.

दहा मिनिटांच्या जॉय राईड्समध्ये जुने गोवा, दिवाडी, चोडण, अटल सेतू, मिरामार, नेरूल खाडी, आग्वाद किल्ला, शिकेरी, कळंगुट आणि बागा हा परिसर आकाशातून पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे.

Goa Tourism Department|Flight Ride
Goa Government: भरपाईची रक्कम वसुलीस सरकार अपयशी

विमानतळावरून हेलि टॅक्सी !

विमानतळावरून थेट हॉटेलवर हवाई मार्गी जाण्याची इच्छा असलेल्यांना आता हेलिकॉप्टरद्वारे ते करता येणार आहे. राज्यातील काही पंचतारांकित हॉटेल्समध्ये हेलिपॅडची सोय केली गेली असून तेथे हेलिकॉप्टर उतरता येईल.

मोपा आणि दाबोळी या दोन्ही विमानतळावरून ही सेवा उपलब्ध असणार आहे. तसेच मुंबई, बेळगाव, हुबळी अशा जवळच्या शहरांमध्ये चार्टर हेलिकॉप्टर घेऊन जाण्याची सुविधा देखील मिळणार आहे. - बिमल सिंगा केसम

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com