
चोर्ला घाट येथे घाटाच्या वरील टप्प्यामध्ये लागलेली रविवारी संध्याकाळी लागलेली आग अजून शमलेली नाही. आज सोमवारी संध्याकाळी उशिरा वनमंत्री विश्वजीत राणे यांनी वन खात्याचे अधिकारी सौरव कुमार व इतरांसोबत चोर्ला घाट परिसरात जाऊन पाहणी केली. तसेच आग कशाप्रकारे लागली आहे, त्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला.
‘ही जी आग लागली आहे, पृष्ठभागावर लागली असून मोठ्या झाडांची नुकसानी झाली नाही. वाऱ्यामुळे आग पसरत आहे. मात्र, आता परिस्थिती नियंत्रणात होत आहे. आवश्यकता भासल्यास केंद्र सरकारी मदत घेऊन हॅलिकॉप्टरच्या सहाय्याने आग विझविली जाईल.
सध्याच्या परिस्थितीवर नियंत्रण आणले जात असून ती अद्याप हाताबाहेर गेली नाही,’ असे राणे यावेळी म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत विनोद शिंदे, वन खात्याचे अधिकारी, केरी पंचायतीचे पंच उपस्थित होते.
सत्तरी भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आग लागून नुकसान झाले आहे. म्हादई अभयारण्य परिसरात आग लागून मोठ्या प्रमाणात जैवविविधता धोक्यात आली आहे. तशातच केरी येथेही काजुच्या बागेला आग लागलेली आहे. तिथे सुद्धा अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्यासाठी बंब घेऊन रवाना झालेले आहेत.
आग कशी लागली याची चौकशी केली जात आहे. मात्र, या परिसरात आग मुद्दामहून लावल्याची माहिती आहे. काही नागरिकांची काजु बागायती असून आपल्या परिसरात आग लावत असाल तर त्यांनी घबरदारी घ्यावी. सत्तरीत अशा घटनांमुळे वनस्पतीला हानी पोहचत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे. आपली जंगले सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे.
- विश्वजीत राणे, वनमंत्री
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.