काणकोणच्या नगरसेवकांची मदत

Dainik Gomantak
मंगळवार, 5 मे 2020

पालिकेच्या आजी माजी नगरसेवकांनी या पूर्वी गरजवंताना जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा स्वखर्चाने केला आहे.

काणकोण

काणकोण पालिका नगरसेवकानी आपल्याला मिळणाऱ्या मानधनातून कोविड-१९ मुख्यमंत्री साहय्यता निधीला ९२ हजार २७५ रुपये दिले.या निधीचा धनादेश नगराध्यक्षा नितू समीर देसाई यांनी उपनगराध्यक्ष हेमंत नाईक गावकर व उपसभापती इजिदोर फर्नाडीस यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत याच्याकडे सुपूर्द केला.यावेळी मुख्यमंत्र्यांनी काणकोण मधून मुख्यमंत्री निधीमध्ये सामाजिक संस्थानी मदत केल्याचे सांगितले.पालिकेच्या आजी माजी नगरसेवकांनी या पूर्वी गरजवंताना जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा स्वखर्चाने केला आहे.त्यामध्ये माजी नगराध्यक्ष समीर देसाई, रमाकांत नाईक गावकर,सायमन रिबेलो याचाही समावेश आहे. आता पर्यंत श्रीस्थळ येथील श्री मल्लिकार्जुन देवालय,करमलघाट येथील श्री गणपती देवालय त्याचप्रमाणे लोलये पंचायतीने मुख्यमंत्री साहय्यता निधीत भर घातली आहे.

 

goa Goa Goa

संबंधित बातम्या