
‘मंत्री तुमच्या दारी’ या कार्यक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे मार्च महिन्यात केपे मतदारसंघात आले होते. त्यावेळी त्यांनी या मतदारसंघातील लोकांच्या समस्या समजून घेतल्या होत्या. त्या सोडविण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार निराधार गंगाधर रायकर यांनी आज आर्थिक मदत देण्यात आली.
`मंत्री तुमच्या दारी` कार्यक्रमात ग्रामस्थांनी त्यांच्यासमोर आपले प्रश्न मांडले होते. यात सोमेश्वर शिरवई येथील गंगाधर रायकर या ज्येष्ठ नागरिकाने आपण व आपली पत्नी आजारी असल्याचे सांगून त्यांना मूलबाळ नसल्याने महिन्याकाठी लागणाऱ्या औषधासाठी आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली होती. आपली सद्यस्थिती कथन केली होती. त्याच्या समस्येची अधिकारी पातळीवरही दखल घेण्यात आली होती. तेव्ही त्यांना मदतीचे आश्वासन दिले होते.
मुख्यमंत्री सावंत यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे केपेचे मामलेदार प्रतापराव गावकर यांनी मुख्यमंत्री निधीतून पन्नास हजार रुपयांचा धनादेश गंगाधर रायकर यांच्याकडे सुपूर्द केला. या मदतीबद्दल गंगाधर रायकर यांनी समाधान व्यक्त केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.