Sagar Ekoskar प्रकरणासंदर्भात पोलीस महासंचालकांना हायकोर्टाची नोटीस

29 ऑगस्ट पर्यंत नोटीसीला उत्तर देण्याचा आदेश
Sagar Ekoskar
Sagar EkoskarDainik Gomantak

मडगाव : वादग्रस्त पोलीस उप अधीक्षक सागर एकोस्कर व अन्य पोलिसांच्या विरोधात आपली छळवणूक चालविल्याचा आरोप केलेले मडगाव येथील व्यावसायिक फ्लोयड कुतीन्हो यांनी या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेली रिट याचिका दाखल करून घेतली असून न्यायालयाने गोवा राज्याचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालकाना नोटीस जारी केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपंकर दत्ता व महेश सोनक यांच्या द्विसदस्यीय पीठाने ही नोटीस जारी केली असून 29 ऑगस्ट पर्यंत या नोटीसीला उत्तर देण्यात यावे असे निर्देश दिले आहेत. कुतीन्हो यांच्या वतीने ऍड. साईश महाम्बरे यांनी ही याचिका दाखल केली होती.

Sagar Ekoskar
‘प्राथमिक शाळेतील मुलांच्या शिक्षणात खंड पडणार’

सागर एकोस्कर हे मायणा कुडतरी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक असताना आपल्या विरुद्ध खोटी केस तयार करून आपल्याला त्यात अडकविण्याचा प्रयत्न केला आणि आपण इंग्लंडमध्ये असल्याचे समजल्यावर आपल्या घराच्या दारावर नोटीस चिकटवून आपले नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला असा दावा करून सागर एकोस्कर, उपनिरीक्षक तेजसकुमार नाईक व पोलीस शिपाई धीरज नाईक व रिझवान शेख यांच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे तक्रार करून त्या तक्रारीची चौकशी करण्याची मागणी केली होती. या तक्रारीची महासंचालकांनी दखल घेऊन चौकशी करावी यासाठी कुतीन्हो यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

या प्रकरणी कुतीन्हो यांनी राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री कार्यालयातही तक्रार केली होती. या दोन्ही कार्यालयांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. या आदेशाची अजून पूर्तता न केल्याने प्रधानमंत्री कार्यालयातून पुन्हा स्मरणपत्र पाठवण्यात आले आहे.

राज्य सरकारच्या गृह खात्याचे अवल सचिव प्रीतीदास गावकर यांनी पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांना पत्र लिहून ही चौकशी त्वरित करावी अशी सूचना केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com