Dona Paula : दोना पावला येथील त्या कॉलनीला प्रतिदिन तीन तास पाणीपुरवठा करा!

गोवा खंडपीठाचे सरकारला आदेश
High Court of Bombay at Goa
High Court of Bombay at GoaDainik Gomantak

दोना पावला येथील ला ओशियाना कॉलनीतर्फे पाणीटंचाई समस्येसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला पाठविलेल्या पत्राची स्वेच्छा दाखल घेण्यात आली आहे. त्यावर या कॉलनीत तसेच अशाच प्रकारची समस्या असलेल्या इतर परिसरांतही दिवसाला दररोज किमान तीन तास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचा आदेश गोवा खंडपीठाने सरकारला दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 मे रोजी ठेवली आहे.

High Court of Bombay at Goa
मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, परशुराम घाटाबाबत मंत्र्यांनी दिली अपडेट

घटनेच्या कलम 21 नुसार लोकांना स्वच्छ व आरोग्यदायी जीवनासाठी मुबलक पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करायला हवा. ज्या भागात पाणीटंचाई आहे, तेथे मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात ॲडव्होकेट जनरल यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला योग्य त्या सूचना कराव्यात.

राज्यातील पाणीटंचाई समस्या सोडवण्यासाठी सरकारने केलेल्या उपायांची माहिती पुढील सुनावणीवेळी द्यावी, असे खंडपीठाने आदेशात म्हटले आहे.

High Court of Bombay at Goa
नागरी पुरवठा खात्याच्या गोदामातून सडलेल्‍या तांदळाचा पुरवठा; स्‍वस्‍त धान्‍य दुकानदार संतप्त

पाणीटंचाईची सविस्तर माहिती द्या

पाणी टंचाईसंदर्भात दोना पावला येथील ला ओशियाना कॉलनीतील नागरिकांनी पत्राद्वारे सादर केलेली माहिती ॲडव्होकेट जनरल यांना तसेच ॲमिकस क्युरी म्हणून नियुक्त केलेल्या गौरीश अग्नी यांना देण्यात यावी.

ॲमिकस क्युरी यांनी पुढील सुनावणीवेळी पाणीटंचाई समस्येबाबत सविस्तर माहिती असलेली याचिका सादर करावी. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या प्रधान मुख्य अभियंत्यांनी याचिकादारांना किमान तीन तास पाणी द्यावे, असा निर्देश गोवा खंडपीठाचे सुट्टीकालीन न्यायमूर्ती रोहित देव यांनी दिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com