High Court of Bombay at Goa: ‘अमारी बाय शी’ला दणका; खंडपीठाचा आदेश

हॉटेल 24 तासांत बंद करा!
High Court of Bombay at Goa
High Court of Bombay at GoaDainik Gomantak

High Court of Bombay at Goa: कळंगुट येथे लाकडाचा वापर करून नव्याने उभारलेल्या ‘अमारी बाय शी’ या रिसॉर्टकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच अग्निशमन दलाचा परवाना नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने हे रिसॉर्ट 24 तासांत बंद ठेवण्याचा आदेश दिला. पुढील सुनावणी 29 मार्चला ठेवली आहे.

गोवा फाऊंडेशनने या रिसॉर्टचे बांधकाम व व्यापार परवान्याला जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. या आदेशामुळे रिसॉर्ट बंद ठेवावे लागल्याने मालकाला चांगलाच दणका बसला आहे.

High Court of Bombay at Goa
Goa BJP : भाजपचे मुख्य कार्यालय कदंब पठारावर बांधणार : सदानंद शेट तानावडे

गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (जीसीझेडएमए) या रिसॉर्टला 200 मीटरच्या ना विकास क्षेत्रात (एनडीझेड) बांधकाम कऱण्यास तात्पुरता ना हरकत दाखला दिला असून त्याच्या आधारे पंचायतीने येथे लाकडी कुटीरे तसेच हॉटेल व्यवसायासाठी व्यापार परवाना दिला आहे.

हे बांधकाम तात्पुरत्या सामानाचे असावे, अशी अट या परवान्यात असतानाही संपूर्ण रिसॉर्ट हे जलतरण तलावासह कायमस्वरूपी बांधकामाच्या पायावर उभारले आहे.

फक्त तळमजला असणे आवश्‍यक असतानाही रिसॉर्टने एकमजला असलेले रेस्टॉरंट उभारले आहे. या रिसॉर्टने परवान्यात घातलेल्या अटींचे उल्लंघन केल्याचे याचिकेद्वारे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

High Court of Bombay at Goa
Protest In Delhi : दिल्लीत ‘जंतर मंतर’वर निदर्शने; जुने गोवेत बेकायदा बांधकाम

परवाने नसताना बांधकाम

या बांधकामासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ व अग्निशमन दलाकडून परवाने घेतले नसल्याचे उघडकीस आल्याने या याचिकेवरील सुनावणीवेळी खंडपीठाने रिसॉर्टच्या कार्यपद्धतीबाबत संताप व्यक्त करत सर्व परवाने नसताना तेथे हॉटेल व्यवसाय कसा सुरू केला, असा प्रश्‍न करत ते त्वरित 24 तासांत बंद करण्याची आवश्‍यकता आहे, असे सुनावले.

यावेळी रिसॉर्टच्या वतीने बाजू मांडणाऱ्या वकिलांनी आपल्या अशिलाला विचारून घेऊन ते बंद केले जाईल, अशी हमी खंडपीठाला दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com