गतवर्षी बर्फातील मासळीची सर्वाधिक निर्यात

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

बर्फातून विविध जातींच्या मासळीची सर्वाधिक निर्यात झाल्याचे नोंदीत झाले आहे. त्याच्याखालोखाल ३ हजार ५१६ मे. टन गोलाकार माणक्यांची निर्यात झाल्याचे मत्स्यव्यवसाय संचालनालयाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

पणजी : राज्यातून सन २०१९-२० या वर्षात परदेशात २८८.५० कोटी रुपयांच्या किंमतीची एकूण १४ हजार ६९९.०७ मे. टन एवढी मासळी निर्यात करण्यात आली आहे. त्यात बर्फातून विविध जातींच्या मासळीची सर्वाधिक निर्यात झाल्याचे नोंदीत झाले आहे. त्याच्याखालोखाल ३ हजार ५१६ मे. टन गोलाकार माणक्यांची निर्यात झाल्याचे मत्स्यव्यवसाय संचालनालयाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

राज्यात मुरगाव पोर्ट ट्रस्टच्या धक्क्यावरून निर्यात होणारी आकडेवारी मत्स्यव्यवसाय संचालनालयाला प्राप्त होते, त्यावरून परदेशात गेलेल्या मासळीची नोंद ठेवली जाते. एमपीटीच्या धक्क्यावरून गतवर्षी २०१९-२० या आर्थिक वर्षात एकूण १४ हजार ६९९.०७ टन मासळीची निर्यात झाली,

त्यातून २८८.५० कोटींचा व्यवसाय झाल्याचे दिसते. एकूण मासळीच्या संख्येतील वर्गीकरणावर नजर टाकली तर बर्फातून विविध मासळींची निर्यात अधिक झालेली दिसून येते. त्याशिवाय राज्यातून माणक्यांची सर्वाधिक निर्यात झालेली दिसून येते. गोलाकार माणक्यांची निर्यात ३ हजार ५१६.५८ मे. टन एवढी आहे. तसेच डब्ल्यू आकाराच्या माणक्यांनाही परदेशात चांगली मागणी असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. 

मागील वर्षातील तीन-तीन महिन्यांच्या कालावधीत जी मासेमारी झाली त्यावर नजर टाकली तर ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात सर्वाधिक ३३ हजार ११ मे. टन एवढी मासेमारी झाली असल्याचे दिसून येते. एप्रिल २०१९ ते मार्च २०२० च्या आकडेवारीवर नजर टाकली तर एकूण ८९ हजार ३५२ मे. टन मासळी सापडलेली आहे.
 

आणखी वाचा

वास्कोत सुरमईची मासळी खवय्यांकडून लयलूट

संबंधित बातम्या