पत्रादेवी ते काणकोणपर्यंतचा महामार्ग क्रमांक 66 ठरतोय वाहतुकीसीठी धोकादायक

दैनिक गोमंतक
मंगळवार, 20 एप्रिल 2021

उड्डाण पुलाचे काम सुरू असतानाच जलवाहिनी टाकण्याचेही काम सुरू असल्यामुळे वाहनांना अडथळे निर्माण होऊन ही वाहतूक कोंडी होत आहे.

करासवाडा-म्हापसा: पत्रादेवी ते काणकोणपर्यंतच्या महामार्ग ६६ चे बांधकाम सध्या जोरात सुरू आहे. येथील रस्त्यावर उड्डाण पूल उभारण्यात येत आहे व तेथेच जलवाहिनी टाकण्याचेही काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे येथे दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे.(Highway Number 66 from Patradevi to Kankon is dangerous for traffic)

उड्डाण पुलाचे काम सुरू असतानाच जलवाहिनी टाकण्याचेही काम सुरू असल्यामुळे वाहनांना अडथळे निर्माण होऊन ही वाहतूक कोंडी होत आहे. दुचाकीस्वारांना धुळीचा सामना करावा लागते आहे. एकूणच हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. त्यामुळे येथील रस्त्याच्या कामाबरोबरच सुरळीत वाहतूक सुरळीत होण्यासाठी उपाययोजनेची गरज आहे. उड्डाण पूल, जलवाहिनी टाकण्याचे काम व वाहतुकीच्या कोंडीची ही छायाचित्रे टिपली आहेत आमचे  छायापत्रकार संदीप देसाई यांनी.

गोवा: पक्षकार्यातील मनमानी कारभारामुळे; फातोर्डा युवक काॅंग्रेसच्या 70...

संबंधित बातम्या