गोव्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

2012 मध्ये देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल देण्याचा मान मिळवला होता. त्यावेळेस 60 रुपयांवर पेट्रोलचा दर जाऊ दिला जाणार नाही असे सरकार सांगत होते.

पणजी: गोवा सरकारने मूल्यवर्धित करात दोन टक्के वाढ केल्यामुळे राजधानी पणजीत मध्ये पेट्रोलचा दर 84.72 रुपये प्रति लिटर झालेला आहे. गोव्यात मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू झाली आहे. राज्य सरकारने पेट्रोल वरील मूल्यवर्धित कर 27% केलेला आहे आज डिझेल 60 पैशांनी महागले आहे. डिझेल वरील मूल्यवर्धित कर एक टक्क्याने वाढवलेला आहे. गोवा सरकारने 2012 मध्ये देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल देण्याचा मान मिळवला होता.

त्यावेळेस 60 रुपयांवर पेट्रोलचा दर जाऊ दिला जाणार नाही असे सरकार सांगत होते. नंतर सरकारने ही मर्यादा 65 रुपये लिटर पर्यंत वाढवली आणि यानंतर पेट्रोल हळूहळू कसे वाढत गेले हे कोणाला समजलेले नाही. आता पेट्रोल वाढीच्या दरात अधिकाधीक वाढ होतांना दिसून येत आहे. साडे पंधरा लाख लोकसंख्येच्या गोव्यात सतरा लाख वाहने असल्यामुळे देशातील सर्वात दरडोई पेट्रोलची विक्री गोव्यात होते.

मराठा आरक्षण : आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; स्थगिती उठणार का याकडे महाराष्ट्राचे लक्ष -

संबंधित बातम्या