Hindi Diwas: हिंदी दिवस उत्साहात साजरा

साळकर उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा
Hindi Diwas 2022
Hindi Diwas 2022Dainik Gomantak

डिचोली: चोडण येथील रघुवीर आणि प्रेमावती साळकर उच्च माध्यमिक विद्यालयात काल ‘हिंदी दिवस’ विविध कार्यक्रमांनिशी उत्साहात साजरा करण्यात आला. मयुर नाईक, दिव्यता बेतकेकर, प्रेरणा न्हावेलकर, बबली प्रसाद, पुजा प्रसाद, ईवांका पेडणेकर, नंदिनी भोमकर, कार्तिक मातोंडकर, आदिती मार्डोळकर, सानिया नुनीस, हर्ष सावंत, साईराज बोरकर, अस्विल रॉड्रीगीस, आशिष खांडेपारकर या विद्यार्थ्यांनी कथा, कविता, पथनाट्य, नृत्य आणि गीत सादर केले.

Hindi Diwas 2022
TMC Goa: तृणमूल काँग्रेसवर विश्वास ठेवा; डेरेक ओब्राईन यांचे गोमंतकीयांना आवाहन

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य संदीप सावळ म्हणाले, हिंदी भाषेचा उपयोग प्रत्येकाने दैनंदिन जीवनात करण्याची गरज आहे. हिंदी आपल्या देशाची राष्ट्रभाषा आहे. या भाषेचा प्रचार आणि प्रसार प्रत्येक भारतीयाने केलाच पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. प्रा. लुईझा लुईस यांनी हिंदी बोलण्याची संधी मिळेल तेव्हा त्या संधीचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी आपले विचार हिंदी भाषेत व्यक्त करावे. यावेळी त्यांनी आपली हिंदीतील कविता वाचून दाखवली.

कार्यक्रमाच्या सुरवातीला हिंदी विषयाचे अध्यापक संतोष मळीक यांनी सर्वांचे स्वागत करून हिंदी दिवस साजरा करण्यामागील इतिहास कथन केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनी रेचल गावकर यांनी केले.

Hindi Diwas 2022
Goa Congress: 'सोचा था शेर निकला चूहा', दिनेश गुंडूरावांचा बंडखोर आमदारांवर हल्लाबोल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com