गोव्यातील हिंदू आमदार-खासदारांनी धर्मासाठी योगदान देण्याची गरज: पद्मश्री स्वामी ब्रम्हेशानंद

Padma Shri Brahmeshanand Swami : सगळ्या हिंदू आमदार खासदारांनी धर्मासाठी काय केलं ? याचा लेखाजोखा एकदा घ्यावा असाही सल्ला ब्रम्हेशानंद यांनी गोव्याच्या आमदारांना दिला आहे.
Padma Shri Brahmeshanand Swami Speaks on Hindu Religion
Padma Shri Brahmeshanand Swami Speaks on Hindu ReligionDainik Gomantak

जर हिंदू आमदार किंवा खासदार म्हणून तुम्हाला काम करता येत नसेल तर, जरी तुम्ही कितीही पदे मिळवली, प्रतिष्ठा मिळवली तरी बिनकामाचे आणि बेकार आहात, असे विधान पद्मश्री स्वामी ब्रम्हेशानंद यांनी गोव्याच्या आमदार-खासदाराना उद्देशून केले आहे.  (Hindu MLAs in Goa need to contribute for religion; Swami Brahmeshanand)

Padma Shri Brahmeshanand Swami Speaks on Hindu Religion
रूपा पारकर खून प्रकरण! चोरलेल्या दागिन्यांतून आरोपी हुसेनने फेडले कर्ज

आचार्य ब्रम्हानंद स्वामी पुण्यतिथी उत्सवानिमित्त 2022 च्या निवडणुकीत निवडून आलेल्या हिंदू आमदार खासदारांचा गौरव सोहळा ब्रम्हेशानंद स्वामींच्या उपस्थितीत पार पडला; त्यावेळी ते बोलत होते.

सगळ्या हिंदू आमदार खासदारांनी धर्मासाठी काय केलं ? याचा लेखाजोखा एकदा घ्यावा असाही सल्ला ब्रम्हेशानंद यांनी गोव्याच्या आमदारांना दिला आहे. तुमच्यामागे धर्म नसेल तर तुमचं वाटोळं होईल असा इशारा देताना हिंदू धर्मासाठी प्रत्येक हिंदूने आपल्या कमाईचा काही हिस्सा बाजूला काढावा अशीही अपेक्षा ब्रम्हेशानंद यांनी व्यक्त केली आहे.

हिंदूंची उध्वस्त झालेली देवळे पुन्हा बांधण्यासाठी पुढाकार घेणारे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचं कौतूक करताना यापुढे धर्मरक्षणासाठी हिंदू म्हणून आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे, असं आवाहन पद्मश्री स्वामी ब्रम्हेशानंद यानी केलं आहे.

ब्रम्हेशानंद भक्तगणांच्या उपस्थितीत झालेल्या हिंदू जनप्रतिनिधींच्या या गौरव सोहळ्याला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मंत्री सुदीन ढवळीकर, सुभाष वेलिंगकर यांच्यासह अनेक हिंदू आमदार हजर होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com