हिंदू रक्षा महाआघाडी ‘गोवा फाईल्स’ बाहेर काढणार

मिकीही आखाड्यात: ‘गोवा फाईल्स’वरून वाद
हिंदू रक्षा महाआघाडी ‘गोवा फाईल्स’ बाहेर काढणार
हिंदू रक्षा महाआघाडीDainik Gomantak

पणजी: सेंट फ्रान्सिस झेवियर यांनी गोव्यात मोठ्या प्रमाणात धर्मांतर करत हिंदूंचा अनन्वित छळ केला, त्याच ख्रिश्चन पाद्रीला गोव्याचा साहेब म्हणणे हे अराष्ट्रीय आणि अमानवी आहे. त्यामुळे ‘काश्मीर फाईल्स’ प्रमाणे 3 मे रोजी हिंदू रक्षा महाआघाडी ‘गोवा फाईल्स’ बाहेर काढणार आहे.

याविरोधात ख्रिश्चन नेते आणि धर्मगुरूंनी आक्रमक भूमिका घेऊन हिंदू रक्षा महाआघाडीचे नियंत्रक सुभाष वेलिंगकर यांच्यावर कडाडून टीका केली आहे. त्यांनी याबाबत माफी मागावी. अन्यथा वेलिंगकर यांना अटक करावी, अशी मागणी मिकी पाशेको यांनी केली आहे. सुभाष वेलिंगकर यांच्या सेंट फ्रान्सिस झेवियरसंदर्भातील वक्तव्याने राज्यात नव्या वादाला तोंड फुटलेले असताना गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनीही आमच्या शब्दांतून वा कृतीतून राज्यातील धार्मिक सलोखा बिघडून जाता कामा नये याचे तारतम्य बाळगले पाहिजे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हिंदू रक्षा महाआघाडी
प्रतापसिंह राणे यांच्या कर्मचारी वर्गाविषयी प्रश्‍न!

कोलवा पोलिसांत तक्रार: याविषयीची ‘गोवा फाईल्स’ बाहेर काढणार, असे वेलिंगकर यांनी जाहीर केल्याने ख्रिश्चन धर्मगुरु आणि नेते आक्रमक झाले आहेत. माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनीही आज त्यांच्याविरोधात कोलवा पोलिसांत तक्रार केली. वेलिंगकर यांनी माफी मागावी. अन्यथा सरकारने त्यांना अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

महाआघाडीचे म्हणणे काय?

साडेचारशे वर्षांपूर्वी गोव्यात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करताना जेजुईट पाद्री फ्रान्सिस झेवियर यांनी जनतेवर अनन्वित छळ केले. हा अत्याचार आणि नरसंहार गोव्यातील हिंदू आणि ख्रिश्चन जनतेसमोर ठेवण्याची वेळ आली आहे, असे म्हणत हिंदू रक्षा महाआघाडीने गोव्याचा खरा रक्षणकर्ता भगवान परशुराम असून त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने 3 मे रोजी गोव्याचा खरा रक्षणकर्ता हा परशुराम आहे, हे सांगणारा कार्यक्रम आखला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.