गोव्याचा इतिहास भुमिपुत्रांपासुन सुरु व्हावा; प्रजल साखरदांडे

भुमिपु्त्र म्हणजे गावकरी.यात कुणबी, गावडा व वेळीप या समाजाचा समावेश होतो. या समाजांचा गोव्याच्या इतिहासात कायदेशीर भुमिका होती व आहेत. तेव्हाच गोव्याच्या इतिहासाला न्या मिळेल.
गोव्याचा इतिहास भुमिपुत्रांपासुन सुरु व्हावा; प्रजल साखरदांडे
Goa : आचार्य धर्मानंद कोसंबी जयंती दिनी व्याख्यान देताना प्रो. प्रजल साखरदांडे.Dainik Gomantak

फातोर्डा: इतिहास (History) एरव्ही राजा, राजकारणी, घराणी यांच्यापासुन सुरु होतो. गोव्यात (Goa) देवराज भोज हा पहिला राजा होता अशी नोंद आहे. नंतर अनेक राजघराणी व शेवटी पोर्तुगाल राजवट गोव्यात होती. पण गोव्याचा इतिहास भुमिपुत्रांपासुन (Bhumiputra) सुरु व्हावा. भुमिपु्त्र म्हणजे गावकरी.यात कुणबी, गावडा व वेळीप या समाजाचा समावेश होतो. या समाजांचा गोव्याच्या इतिहासात कायदेशीर भुमिका होती व आहेत. तेव्हाच गोव्याच्या इतिहासाला न्या मिळेल. पुर्वी हे गावकरीच गावचे प्रमुख होते. भोज राजाने या भुमिपुत्रांना जमीन दिली. असे इतिहासाचे गाढे अभ्यासक प्रो. प्रजल साखरदांडे यांनी प्रतिपादले.

Goa : आचार्य धर्मानंद कोसंबी जयंती दिनी व्याख्यान देताना प्रो. प्रजल साखरदांडे.
'चॉकलेटमुळे' मिळणार रेल्वे खात्याला 12 लाखांचा महसूल

गोमन्त विद्या निकेतनने आचार्य धर्मानंद कोसंबी जयंती दिनी आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष जनार्दन वेर्लेकर यानी सर्वांचे स्वागत केले. रेश्मा राऊत देसाई यानी सुत्रसंचालन करताना प्रो. साखरदांडे यांची ओळख करुन दिली. जेव्हा आम्ही एखाद्या प्रख्यात व्यक्तिवर बोलतो तेव्हा तो ज्या परिस्थितीत जगला, त्याच्या सभोवतालचे वातावरण हे जाणुन घेणे आवश्यक असल्याचे प्रो. साखरदांडे म्हणाले.

धर्मानंद कोसंबी हे जरी गांधीवादी, समाजवादी, मार्क्सवादी विचारांचे होते, त्यांच्यावर गौतम बुद्धाच्या शिकवणिचा प्रभाव होता तरी त्यांचे वेगळे तत्व होते. ते अज्ञेयवादी समाजवादी विचारांचे होते. ते सतत स्वतालाच प्रश्र्न विचारुन त्यांच्या उत्तराच्या शोधांत असत. आपल्या प्रश्र्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांनी अनेक देशांमध्ये व भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये भ्रमंती केली.

Goa : आचार्य धर्मानंद कोसंबी जयंती दिनी व्याख्यान देताना प्रो. प्रजल साखरदांडे.
एक दिवसीय विक्रेता मेळाव्याचे आयोजन

आचार्य कोसंबी मानीत की महात्मा गांधीवर बुद्धा व झिजस या दोघांच्याही विचारांचा प्रभाव होता. ते समाजातील समानतेवर विश्र्वास ठेऊन होते. ते बुद्धांचे विचार व तत्व जाणुन घेण्यासाठी ते पाली भाषा शिकले. ते बुद्ध प्रणालीचे विद्वान असल्याने त्यांच्याबद्दल गैरसमज झाले. त्यामुळे त्याना स्वातंत्र्यसैनिक कधीच मानले गेले नाही. मात्र श्रीलंकेत कोसंबी याना मान व आदर होता व अजुनही ते श्रीलंकन त्याना मानतात.

गोमंतकीय चांगले आदरातिथ्य व पाहुणचार करु शकतात पण ते दुसऱ्यांचा मोठेपणा मानण्या इतके नक्कीच उदार नाहीत असे सांगुन साखरदांडे म्हणाले की आचार्य धर्मानंद कोसंबी यांचा गोव्याच्या इतिहासात जेवढी पाहीजे तेवढी नोंद नाही.

ज्या प्रश्र्नांच्या शोधात आचार्य कोसंबी होते त्याची त्यांना अखेरपर्यंत उत्तरे मिळाली की नाही याबद्दल आपल्याला शंका असल्याचे सांगुन व्याख्यानाचा शेवट केला. नितीश नायक यानी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Related Stories

No stories found.