फोंड्यात हिट अँड रनचा थरार; पाठलाग करुन मद्यधुंद चालकाला चोप

भरधाव कारचालकाची पोलीस कर्मचाऱ्याला धडक, गोमेकॉमध्ये उपचार सुरु
फोंड्यात हिट अँड रनचा थरार; पाठलाग करुन मद्यधुंद चालकाला चोप
Hit and Run Case in Ponda GoaDainik Gomantak

फोंडा : फोंड्याजवळच असलेल्या खांडेपार येथे एका पोलीस कर्मचाऱ्याला धडक देऊन पसार होणाऱ्या चालकाच्या कारचा अपघात झाला आहे. भरधाव वेगातील कारची एका झाडाला धडक बसून कारने जागीच पेट घेतला आहे. कारच्या मागावर असणाऱ्या आरोपी चालकाला लागलीच ताब्यात घेतलं मात्र पाठलाग करणाऱ्या तरुणांनी चालकाला चोप दिला आहे.

Hit and Run Case in Ponda Goa
तृणमूलचे गोव्यात ‘बारा’ का वाजले?

मिळालेल्या माहितीवरुन, या कारचालकाचं नाव अक्षित अग्रवाल असून सकाळी उसगाव परिसरात त्याने मद्यधुंद अवस्थेत काही वाहनांना धडक दिली होती. काही प्रत्यक्षदर्शींनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी ठिकाठिकाणी नाकाबंदी केली. मात्र पोलिसांना चकवा देत कारचालक धारबांदोडा परिसरात पळून गेला होता. धारबांदोड्यावरुन परतत असताना अचानक पुन्हा पोलिसांनी आणि काही वाहनचालकांनी या कारचा पाठलाग सुरु केला.

Hit and Run Case in Ponda Goa
शिरगावच्या लईराई देवीचा गुरुवारी जत्रोत्सव

दुपारी 11.30 वाजण्याच्या सुमारास याच आरोपीने फोंडा पोलीस स्थानकातील शिपाई सागर पटेकर यांना धडक दिली आणि पसार झाला होता. मात्र पोलिसांनी आणि काही वाहनचालकांनी कारचा पाठलाग सुरुच ठेवला होता. अखेर भरधाव वेगातील कारची एका झाडाला बसली आणि तिथेच खेळ खल्लास झाला. झाडाला धडक बसताच कारने पेट घेतला. पोलिसांनी लागलीच आरोपी चालकाला ताब्यात घेतलं. मात्र तोपर्यंत पाठलाग करणाऱ्या काही तरुणांनी आरोपीला चांगलाच चोप दिला आहे. दरम्यान कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर गोमेकॉमध्ये उपचार सुरु आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.