'ख्रिस्ती बांधवांच्या पवित्र सप्ताह निमित्त सुट्टया दिल्या जाणार' मुख्यमंत्री प्रमोद सावंतांची ग्वाही

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

पुढील महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ख्रिस्ती बांधवांचा पवित्र सप्ताह निमित्त त्या काळात येणाऱ्या सर्व सुट्ट्या दिल्या जातील.

पणजी: पुढील महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ख्रिस्ती बांधवांचा पवित्र सप्ताह निमित्त त्या काळात येणाऱ्या सर्व सुट्ट्या दिल्या जातील असे उत्तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी  विरोधकांनी केलेल्या टीकेला दिले. काल दिगंबर कामत यांनी राज्यातील ख्रिस्ती बांधवांचा पवित्र सप्ताह २८ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत आहे याच काळात बारा दिवस अधिवेशन बोलावणे आश्चर्यकारक आहे असे ट्विट केले होते.

गोवा नगरपालिका प्रभाग आरक्षणावर निडणूक आयोगाने दिलं न्यायालयाला उत्तर

दरम्यान, टॅक्सी चालकांचा गोवा माईल्स विरुद्धचा प्रश्न वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो हे सोडवतील तसेच पालिका निवडणुकीसाठी भाजप समर्थक पॅनल सर्व पालिकांमध्ये लवकरच जाहीर केले जाईल अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिली

संबंधित बातम्या