
पिसुर्ले: पर्ये मतदारसंघातील होंडा पंचायतीच्या वतीने पंचायत क्षेत्रातील कचरा निर्मूलन करण्याच्या दृष्टीकोनातून स्वखर्चाने उभारण्यात आलेल्या तालुक्यातील पहिल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन दि. 3 मे रोजी अक्षय तृतियाच्या मुहूर्तावर आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे, होंडा सरपंच आत्मा गावकर, उपसरपंच शशिकला राणे, पंच प्रतीक्षा गावडे, लिना गावडे, पांडुरंग गावकर, विक्रांत देसाई, शिवदास माडकर, सया पावणे, वाळपई गटविकास अधिकारी सूर्याजीराव राणे, साहाय्यक अभियंते वसंत परब, कनिष्ठ अभियंते राजेश दळवी, गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाचे अभियंते रोहन घाडी, पंचायत सचिव शांबा देसाई, कंत्राटदार प्रशांत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते .
आमदार राणे म्हणाल्या की, सध्या राज्याच्या विविध भागांत कचऱ्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. होंडा पंचायतीच्या वतीने कचरा निर्मूलन करण्यासाठी उचलेले पाऊल कौतुकास्पद असून पर्ये मतदारसंघातील इतर पंचायतींनीही पुढाकार घेऊन आपापल्या भागात कचरा व्यवस्थापन उपाययोजना आखावी.
सदर प्रकल्पाची पायाभरणी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी करण्यात आली होती. अवघ्या पाच महिन्यांत सुमारे 17 लाख रुपये खर्चून पंचायतीच्या फंडातून हा प्रकल्प उभारला आहे. अशी माहिती पंचायत सचिव शांबा देसाई यांनी दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.