‘सत्य व भाजप यांची सांगड बसत नसल्यानेच बदली’: दिगंबर कामत

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

राज्याच्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थे बद्दल त्यांना नेहमीच चिंता होती व ते खर्चकपात करा व वायफळ खर्च बंद करा असा सरकारला नेहमी सल्ला देत होते असे कामत यांनी नमूद केले आहे.

पणजी: सत्याचे पालक राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गोमंतकीयांच्या भावना व अस्मितेचा आदर करत म्हादई, अर्थव्यवस्था व खर्च कपात, कोविड हाताळणी या विषयांवर गोमंतकीयांचे हित जपले. सत्य व भाजप यांची सांगड बसू शकत नाही व त्यामुळेच राज्यपालांचा बदली आदेश निघाला, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.  

गोवा व गोमंतकीयांना त्यांच्या मार्गदर्शनाची  जेव्हा अत्यंत गरज होती त्याचवेळी त्यांची बदली होणे हे खरेच दु:खदायी आहे. त्यांनी नेहमीच गोव्याच्या भल्यासाठी निर्णय घेतले व सामान्य माणसांचा आदर करणे व पर्यावरण व निसर्गाची  राखण करणे अशी त्यांची नेहमीच भावना होती. राज्याच्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थे बद्दल त्यांना नेहमीच चिंता होती व ते खर्चकपात करा व वायफळ खर्च बंद करा असा सरकारला नेहमी सल्ला देत होते असे कामत यांनी नमूद केले आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या