सेवा सप्ताहानिमित्त दवर्लीत कोविड योद्ध्यांचा गौरव

वार्ताहर
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहा निमित्ताने दवर्ली आरोग्य केंद्राचे डॉक्टर,परिचारीका,व कर्मचारी नावेली आरोग्य केंद्रातील डॉक्टर,परिचारीका व कर्मचाऱ्यांच्या तसेच मडगाव अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा "कोविड १९ योद्धा" म्हणून सन्मान पत्र, मिठाई व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

नावेली: माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहा निमित्ताने दवर्ली आरोग्य केंद्राचे डॉक्टर,परिचारीका,व कर्मचारी नावेली आरोग्य केंद्रातील डॉक्टर,परिचारीका व कर्मचाऱ्यांच्या तसेच मडगाव अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा "कोविड १९ योद्धा" म्हणून सन्मान पत्र, मिठाई व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

या वेळी नावेली भाजपा मंडळाचे अध्यक्ष परेश नाईक, सरचिटणीस दिपक सावंत,गोवा प्रदेश भाजपा सचिव सर्वानंद भगत, प्रमोद प्रभू, जिल्हा पंचायत सदस्य उल्हास तुयेकर, अविनाश सरदेसाई, बाबू सिंगबाळ,मधुकला शिरोडकर उपस्थित होते.

नावेली आरोग्य केंद्राचे डॉ.प्राजक्त कामुलकर,परिचारीका व कर्मचाऱ्यांच्या सन्मान करण्यात आला.दवर्ली आरोग्य केंद्रातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या तसेच अग्निशमन दळाचे अधिकारी नितीन रायकर इतर अधिकारी वकर्मचाऱ्यांचा कोविड १९योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.

संबंधित बातम्या