Bus Service: गोव्यात हॉप ऑन हॉप ऑफ बससेवा पुन्हा होणार सुरू

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जीटीडीसी कोरोनामुळे बंद पडलेली हॉप ऑन हॉप ऑफ बससेवा पुन्हा सुरू होणार आहे.
Bus Service |Goa
Bus Service |GoaDainik Gomantak

Bus Service: पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गोवा पर्यटन विकास महामंडळ (जीटीडीसी) नवीन उपक्रम आणि सेवा सुरू करत आहे. त्या दिशेने आणखी एक पाऊल उचलताना कोरोनामुळे बंद पडलेली हॉप ऑन हॉप ऑफ बससेवा पुन्हा सुरू होणार आहे.

सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वांवर बस सेवा चालणार असून यंदा यात अनेक बदल केले गेले आहे. प्रायव्ही टुरिझम कंपनी सेवा चालवणार आहे. 18 फेब्रवारी रोजी याचे उद्‍घाटन होणार आहे.

‘हॉप ऑन हॉप ऑफ’ बस सेवा चालवण्यासाठी प्रायव्ही कंपनीने स्पेनच्या सिटी साईटसियिंग कंपनीसोबत करार केला आहे. पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवा मिळावी या मागचा विचार आहे. प्रायव्हीने आपल्या ताफ्यात 5 बसेस आणल्या आहेत.

त्यापैकी 2 डबल डेकर आणि 3 सिंगल डेकर आहेत. डबल डेकरची प्रवासी क्षमता 48 आणि सिंगल डेकरची 28 इतकी आहे. जुने गोवा ते वागातोर असा हा बसेसचा मार्ग निश्‍चित करण्यात आला आहे. जुने गोवा-रायबंदर-पणजी-दोनपावल - पर्वरी-कळंगुट-बागा-वागातोर असा मार्ग आहे. सकाळी 9 वा. ते रात्री 11 वा. पर्यंत ही सेवा असेल,अशी माहिती बिमल सिंगा केसम यांनी दिली.

Bus Service |Goa
Ponda Municipality: फोंडा पालिकेचा सोपोकर 75.36 लाख निर्धारित

अशी असेल सेवा

पर्यटकांना आपल्या मर्जीनुसार उतरून फिरता येणार आहे. कारण बस सेवा रात्री उशिरापर्यंत चालणार आहे. मार्गावर हॉप ऑन हॉप ऑफ बसचे स्टॉप असणार असून तेथे येऊन बसमध्ये प्रवाशांना चढता-उतरता येईल. यासाठी नवीन ॲप तयार केले जात आहे.

त्यामुळे बस कुठे पोहोचली आहे, याची सविस्तर माहिती पर्यटकांना मिळणार आहे. तिकिट विक्री स्थानिक ट्रॅव्हल एजेंट, कंपनीचे संकेतस्थळ आणि जीटीडीसीद्वारे उपलब्ध केले जाईल, असे केसम यांनी सांगितले.

Bus Service |Goa
Goa News: म्हादई, कोळसा हाताळणीमुळे आता ‘करा वा मरा’ची वेळ

हॉप ऑन हॉप ऑफ बस सेवा पुन्हा सुरू होणे ही गोव्यातील पर्यटन उद्योगासाठी चांगली गोष्ट आहे. या सेवेचा दीर्घकालीन लाभ पर्यटन उद्योगाला होऊ शकतो. परंतु त्यासाठी चांगली सेवा देण्याची आवश्‍यकता आहे.

यासाठी नियमित वेळ, तिकीट प्रणाली, स्टॉप, पिक नेऊन सोडून पुन्हा घेऊन येणे आवश्‍यक आहे. तसेच ही अधिक मनोरंजक करण्याचा वाव असून राज्यातील वारसा स्थळांची माहिती देण्यासाठी गाईड ठेवला पाहिजे.- नीलेश शहा, अध्यक्ष, टीटीएजी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com