Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे आमदार अपात्रतेबाबत आशेचा किरण

गिरीश चोडणकर : शिवसेनेसंदर्भातच्या निरीक्षणानंतर मत व्यक्त
Girish Chodankar
Girish ChodankarGomantak Digital Team

Maharashtra Political Crisis : महाराष्‍ट्रातील शिवसेनेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे गोव्यातील ८ आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईवर मोठा परिणाम होणार आहे. पक्षांतर प्रकरण व राज्यपाल कार्यालयाचा गैरवापर यासंदर्भात न्यायालयाने केलेल्या निरीक्षणामुळे गोवा व देशासाठी आशेचा किरण मिळाला आहे.

विधीमंडळ पक्षाच्या दोन तृतियांश सदस्यांना मूळ राजकीय पक्षाच्या विलिनीकरणाच्या निर्णयाशिवाय निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचा हा प्रवेश अडचणीत येण्याची शक्यता आहे, असे मत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केले.

Girish Chodankar
Sanquelim-Ponda Municipal Council Election 2023: फोंडा-साखळीमध्ये 16 रोजी नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवड

सर्वोच्च न्यायालयाने भारतीय घटनेतील दहाव्या परिशिष्टानुसार अंतर्गत राजकीय पक्षाचे महत्त्व ओळखले आहे व त्यावर हा निकाल देताना अधिक जोर दिला आहे. विधीमंडळ पक्षाच्या दोन तृतियांश सदस्यांनी मूळ राजकीय पक्षाच्या विलिनीकरणाच्या निर्णयास सहमती दिली पाहिजे याचा अर्थ मूळ राजकीय पक्षाच्या निर्णयाशिवाय आमदार स्वतः विलिनीकरणाचा निर्णय घेऊ शकत नाही व तो घेतल्यास ते अपात्र ठरू शकतात.

Girish Chodankar
Daily Horoscope 12 May : आनंदी आनंद गडे! यांच्यासाठी असणार आनंदाचा दिवस; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य

आमदार अपात्रतेच्या याचिकांवर योग्य वेळेत सभापतींनी निर्णय घेणे आवश्‍यक असल्याचे निरीक्षण न्यायालयाने केले आहे. त्यामुळे गोव्याच्या सभापतींसमोर प्रलंबित आठ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेत त्यांचे भवितव्य कठीण होऊन बसले आहे, असे चोडणकर म्हणाले.

Girish Chodankar
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मधील प्रसिद्ध अभिनेत्रीचे निर्मात्यांवर लैंगिक छळाचे आरोप

न्यायसंस्थेवरील विश्‍वास वाढला

सर्वोच्च न्यायालयात काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या १० आमदार अपात्रतेची याचिका प्रलंबित आहे. महाराष्ट्र शिवेसेनेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे त्याचा फायदा माझ्या या याचिकेत होणार आहे.

घटनेनुसार मूळ राजकीय पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन झाला नसेल, तर फुटीर दोन तृतियांश आमदार हे कसे विलीन होऊ शकतात असा मुद्दा चोडणकर यांनी उपस्‍थित केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निकालावरून न्यायसंस्थेवरील लोकांचा विश्‍वास पुन्हा निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com