प्रियोळवासीयांच्या आशेला धुमारे

गावडे यांच्या मंत्रिपदामुळे जल्लोष: उर्वरित विकासकामे मार्गी लागण्याची आशा
Priol
PriolDainik Gomantak

फोंडा: सलग दुसऱ्यांदा मंत्रिपद मिळाल्यामुळे प्रियोळात सध्या खुशीचे वातावरण आहे. गेल्या वेळी सुरुवातीला फोंडा तालुक्यात मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर आणि प्रियोळचे आमदार गोविंद गावडे हे दोन मंत्री होते. पण 2019 साली सुदिनना मंत्रिपदावरून डच्चू दिल्यानंतर गोविंद गावडे हे फोंडा तालुक्याचे एकमेव मंत्री राहिले. त्यामुळे ते फोंडा तालुक्याचे पालकमंत्री बनले होते. आता परत गावडे यांना मंत्रिपद मिळाल्यामुळे प्रियोळवासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Priol
गोव्यात मार्चमध्ये कोरोनामुळे 11 मृत्यू

मागच्या वेळी गावडे यांच्याकडे कला व संस्कृती आणि सहकार खाते होते. यावेळी त्यांना कोणते खाते मिळणार, हे अजून स्पष्ट झाले नसले तरी त्यांनी कोणत्याही खात्याचे मंत्री म्हणून काम करण्याची तयारी ठेवली आहे. सध्या मंत्रिमंडळात रवी नाईक, सुभाष शिरोडकर, माविन गुदिन्हो, बाबूश मोन्सेरात, विश्वजीत राणे, रोहन खंवटे, नीलेश काब्राल यांसारखे अनुभवी मंत्री असल्यामुळे गोविंद गावडे यांच्यासमोरचे आव्हान वाढले आहे. पण सलग पाच वर्षांचा मंत्रिपदाचा अनुभव असल्यामुळे ते हे या कसोटीला उतरतील, अशी शक्यताही निर्माण झाली आहे.

वेरे-वाघुर्मेचे सरपंच सत्यवान शिलकर यांनी गावडे यांना दुसऱ्यांदा मंत्रिपद दिल्याबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आभार मानले असून गावडे यांच्यामुळे प्रियोळात परत एकदा विकासाची गंगा येईल, अशी आशा व्यक्त केली आहे.

विजय मिळाला; पण मताधिक्य घटले

प्रियोळ हा तसा ग्रामीण बाज असलेला मतदारसंघ. या मतदारसंघात एकूण सात पंचायती येत असल्यामुळे त्यातून या मतदारसंघाचा ग्रामीण चेहरा अधोरेखित होतो. मागच्यावेळी गावडे यांनी मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्यावर तब्बल 4800 मताधिक्य मिळवले होते. पण यावेळी त्यांची आघाडी घटून ती 213 मतांवर थांबली. मागच्या वेळी त्यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली होती. यावेळी ते भाजपचे अधिकृत उमेदवार होते.

Priol
पैगीण पंचायतीचे सरपंच जगदीश गावकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव समंत

अडथळ्यांतून पार केली विजयाची सीमा

यंदा भाजपच्याच संदीप निगळ्ये यांनी बंड करून अपक्ष उमेदवारी दाखल केल्यामुळे गावडेंसमोरचे आव्हान वाढले होते. त्यामुळे मगोप बाजी मारणार, अशी हवाही निर्माण झाली होती. पण अटीतटीच्या लढतीत गावडे यांनी प्रियोळचा गड काबीज केलाच. गावडे यांच्या विजयामुळे प्रियोळमधून सलग दोन वेळा निवडून येण्याची प्रथाही शाबूत राहिली. आता प्रियोळमधील उर्वरित विकासकामे पूर्णत्वास जाईल, असे दिसते आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com