
Fire in Goa: साट्रे-सत्तरी येथे शनिवारी (ता.४)डोंगराला लागलेल्या आगीमुळे येथील काजूबागायती पिके जळाली होती. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक नागरिकांनी व वन खात्याने कंबर कसली होती.
मंगळवारी (ता.४) काजू बागायतीत लागलेली आग विझली असून सध्यातरी काजू पिकांना धोका टळलेला आहे. पोफळी पिके अतिशय दूरवर आहेत. त्यामुळे त्यांना याचा धोका नाही. साट्रेच्या अतिशय चढत्या डोंगरावर आगीने पेट घेतला होता. ही आग इतकी भीषण होती की ती पसरत जात काजू पिकेही जळाली आहेत.
साट्रेतील अर्जुन केरकर, नरेश केरकर, कृष्णा गावकर, कृष्णा गावस आदींना या आगीचा जबर फटका बसलेला आहे. त्यांच्या काजू बागायतीला अधिक झळ पोहोचली आहे. सोमवारी (ता.६) डोंगरावर आग धुमसत होती. पण काजू पिकातील आग शमलेली आहे.
राजेश गावस म्हणाले की, सध्यातरी काजू पिकाला धोका नाही. आग नियंत्रणात आहे. शनिवारी वेळीच लोकांनी धाव घेतली नसती तर आग अनेक लोकांच्या काजू बागायतीत पसरली असती व ती नियंत्रणात आणणे कठीण झाले असते.
साट्रेतील काजू बागायतदारांना आता सरकारने नुकसान भरपाई दिली पाहिजे. काल स्थानिक तलाठ्याने येऊन माहिती नमूद करून घेतलेली आहे. साट्रे गावात सुपारी पिके आहेत. पण त्यांना कोणताही धोका नाही.
काजू पिकांतील आगही शांत आहे. या परिसरामध्ये अनेक वनौषधी व दुर्मीळ जंगली झाडांचा समावेश आहे. त्यांना आगीचा फटका बसलेला आहे. याचे प्रतिकूल परिणाम जंगली प्राण्यांवर होण्याची शक्यता असून गावात वन्यप्राण्यांचे येण्याचे प्रमाण वाढण्याची भीती निर्माण झालेली आहे.
- लक्ष्मण गावस, स्थानिक नागरिक
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.