फलोत्पादन महामंडळाकडून  कांद्याची विक्री चढ्या दराने

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

नागरी पुरवठा खाते कांदे ३२ रुपये प्रति किलो या दरामध्ये घाऊक किंमत दुकानांमध्ये विकत होते तर फलोत्पादन महामंडळ आपल्या अधिकृत केंद्रांवरून ७५ रुपये प्रति किलो या दराने विकत आहेत. त्यामुळे कांद्याची ही विक्री चढ्या दराने केली जात असल्याचा आरोप करण्यात आला. 

पणजी : आम आदमी पक्षाच्या महिला विभागाच्या कार्यकर्ते व सदस्यांनी नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्री गोविंद गावडे यांनी कांद्याची विक्री बंद करण्याच्या दिलेल्या धमकीमुळे त्यांच्यावर टीका करत निशाणा साधला. कांद्याची विक्री रास्त दरामध्ये घाऊक किंमतीच्या दुकानांमध्ये होणारी विक्री बंद करण्याचा इशारा गावडे यांनी दिला होता. याविषयी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्या श्रीमती पेट्रिसिया फर्नांडिस म्हणाल्या, "गोव्यातील स्वयंपाकामध्ये अतिशय महत्वाचा घटक असणारा कांदा खुल्या बाजारात १२० रुपये प्रति किलो या दरामध्ये उपलब्ध होता. नागरी पुरवठा खाते कांदे ३२ रुपये प्रति किलो या दरामध्ये घाऊक किंमत दुकानांमध्ये विकत होते तर फलोत्पादन महामंडळ आपल्या अधिकृत केंद्रांवरून ७५ रुपये प्रति किलो या दराने विकत आहेत. त्यामुळे कांद्याची ही विक्री चढ्या दराने केली जात असल्याचा आरोप करण्यात आला. 

संबंधित बातम्या