राजधानी हॉटेल व्यवसाय अपूर्णपणेच सुरू...

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

राजधानी पणजीतील हॉटेल व्यवसाय अद्याप अपूर्णपणेच सुरू आहेत. जेवण व नाष्टा पुरविणाऱ्या हॉटेलचे कामकाज अपुऱ्या कर्मचाऱ्यांवरच सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला काही हॉटेल अद्याप सुरू झालेले नाहीत. एका बाजूला देश-विदेशातून पर्यटक हळूहळू गोव्यात दाखल होत आहे. 

 पणजी : राजधानी पणजीतील हॉटेल व्यवसाय अद्याप अपूर्णपणेच सुरू आहेत. जेवण व नाष्टा पुरविणाऱ्या हॉटेलचे कामकाज अपुऱ्या कर्मचाऱ्यांवरच सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला काही हॉटेल अद्याप सुरू झालेले नाहीत. एका बाजूला देश-विदेशातून पर्यटक हळूहळू गोव्यात दाखल होत आहे. 

राज्यातील आर्थिक उलाढालही त्यामुळे हळुवार का होईना पण सुरू झाली आहे. अनेक निवासी हॉटेल पूर्णक्षमतेने सुरू झालेले नाहीत. जे सुरू झाले आहेत, त्यातील काही खोल्याच वापरात येत नसल्याने बंद आहेत. ज्यांचे हॉटेल सुरू आहेत, त्या हॉटेलमध्ये अद्यापि बसण्याची व्यवस्था सुरू केलेली नाही.

महापालिकेच्या इमारतीपासून जवळ असलेल्या चौकातील आराम हॉटेलमध्ये अद्याप बाहेर उभे राहूनच नाष्टा किंवा चहा प्यावा लागत आहे. यापूर्वी हॉटेलमध्ये दररोज हजारो लोकांची येजा सुरू असत, पण आता हाताच्या बोटावर येणारे लोक याठिकाणची सेवा घेत असताना नजरेस पडतात.  पणजी रेसिडन्सीच्या इमारतीतच तळमजल्यावर असलेले हॉटेल हैदराबाद निवासी असलेल्या या हॉटेलच्या मालकाने अद्याप ते सुरू करण्याचा विचारच केलेला 
नाही रित्झ क्लासिक हॉटेलच्या व्यवस्थापकानेही कर्मचारी कमी असल्याचा परिणाम होत असल्याचे दिसून येते असे सांगितले.

संबंधित बातम्या