किनारी भागात हॉटेल्स सप्टेंबरनंतर सुरू?

वार्ताहर
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

कोरोना लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसायाना आर्थिक फटका बसलेला आहे . त्यात अधिक फटका बसला तो पर्यटन व्यवसायाशी निगडित असलेल्या लहान मोठ्या व्यावसायिकाना, त्यात हॉटेल शॅक याना जास्त फटका बसला

मोरजी: कोरोना लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसायाना आर्थिक फटका बसलेला आहे . त्यात अधिक फटका बसला तो पर्यटन व्यवसायाशी निगडित असलेल्या लहान मोठ्या व्यावसायिकाना, त्यात हॉटेल शॅक याना जास्त फटका बसला. काम नसतानाही कामगारांना लॉकडाऊन काळात पगार द्यावा लागला. हॉटेल व्यावसायिकांची मागणी लक्षात घेऊन आणि राज्यात येणाऱ्या पर्यटकांची किंवा अडकून पडलेल्या पर्यटकांची सोय करण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारने आणि पर्यटन खात्याने काही नियम व अटी घालून पर्यटन हॉटेल व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली खरी, मात्र मोरजी, मांद्रे, हरमल व केरी तेरेखोल या भागातील पर्यटन हॉटेल सुरू करण्यास मालक तयार नाही.सप्टेंबरनंतरच हॉटेल व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय अधिकाअधिक हॉटेल मालक व चालकांनी घेतलेला आहे.

 काहीजण म्हणतात अटी कडक आहेत , तर काहीजण म्हणतात आता व्यवसाय सुरु करणे कठीण आहे , कामगारवर्ग गावाला परतले . ते कामगार परत आले नाही तर बाहेरच्या कामगारांना हॉटेल उद्योगातून किमान २० कोटी रुपये पगाराच्या पोटी जायचे , हा सर्व पैसा गोवेकाराना मिळू शकतो , ज्याना हॉटेल कामाचा अनुभव व आवड आहे, त्याना संधी मिळू शकते, गोवेकरांना आखाती देशात जाण्याची गरज नाही.

सरकारने लॉकडाऊन काळात एक थेट परिपत्रक काढून हॉटेल व्यवसाय बंद करा असे कळवले होते तसाच नियम शिथिल करून हॉटेल व्यवसाय सुरु करण्यास परिपत्रक काढायला हवे होते . असे मत हॉटेल व्यवस्थापकाने व्यक्त केले .  कोरोना च्या महामारीने पर्यटन व्यवसायाला बराच फटका बसलेला आहे . ऐन पर्यटन हंगामात या व्यवसायावर गदा आणली . आणि आता जेव्हा हॉटेल व्यवसाय शक्य नाही त्यावेळी मोठ मोठे नियम घालून पर्यटन हॉटेल व्यवसाय सुरु करा असे सरकारने जाहीर केले . कोरोनाच्या पाश्वभूमीवर पर्यटन हॉटेल व्यवसाय सुरु करणे कठीण आहे . जे नियम घालून दिलेले आहे ते नियम १०० टक्के पाळणे कठीण आहे.

कामगार आणणार कुठून?
कोरोना मुळे हॉटेल कामगार कर्मचारी आपापल्या गावाला गेल्यामुळे परत मधेच हॉटेल व्यवसाय सुरु करताना खूप अडचणी आहेत . त्या अडचणी सरकारने समजून घ्यायला हवे . कामगार , कर्मचारी मिळणे ही मोठी समस्या आहे .

डॉक्टर कसा पोचणार ?
ज्या हॉटेलात वास्तव्य करून पर्यटक राहत असेल आणि त्याला एखाद्यावेळी खोकला ताप आला तर १५ मिनिटाच्या आत आरोग्य केंद्राचा डॉक्टर त्या हॉटेलात पोचला पाहिजे . एकाच वेळी विविध ठिकाणी असा प्रकार घडला तर कुठला डॉक्टर १५ मिनिटात पोचू शकेल, कोण उपलब्ध असणार ही समस्या समोर आहे . प्रत्येक हॉटेलात एक डॉक्टर आणि एक नर्स असायला हवी . हे शक्यच नाही .   सरकार पर्यटकांना आणण्याचे धोरण म्हणजे लोकाना त्रासात घालण्यासारखे आहे . पावसाळ्यात पर्यटन व्यवसाय बंद असतो . त्यामुळे काहीही फरक पडणार नाही , त्यापेक्षा सरकारने अगोदर या रोगावर लस उपलब्ध झाल्यानंतर बाहेरील पर्यटकाना राज्यात आणावे .

बनावट सर्टिफिकेट्स आणू शकतात
पर्यटकांकडे कोरोना अहवालाची नकारात्मक सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे . आज देशात कोणतीच अशक्य गोष्ठ नाही . अनेक बनावट सर्टिफिकेट मिळतात . मग कोरोना नकारात्मक सर्टिफिकेट का मिळणार नाही . पर्यटक राज्यात येण्यासाठी कोरोना नकारात्मक बनावट सर्टिफिकेट आणू शकतात, ही भीती सुदेश सावंत यांनी व्यक्त केली आहे. त्यापेक्षा सरकारने पर्यटन हंगामानंतर ज्या हॉटेल व्यावसायिकाना नुकसानी झाली त्यांना एखादे पॅकेज द्यावे अशी मागणी सावंत यांनी केली .

रेवा रेसॉर्टचे व्यवस्थापक सूरज नाईक यांनी माहिती देताना, हॉटेल व्यवसाय सुरु करणे अश्यक्य नाही . मात्र ज्या पर्यटकांकडे ४८ तासाची कोरोना नकारात्मक  सर्टिफिकेट असेल तो विमानात येईल तर तो लगेच पोचणार मात्र ट्रेन मधून आला तर ४८ तासापेक्षा जास्त प्रवास त्यांचा ट्रेनमधेच होणार आणि हा संसर्ग असेल तर तो त्याच ठिकाणी वाढू शकतो.

हॉटेल सुरु करण्याची जबाबदारी कोणी घेत नाही. आम्हीही आमचे रेस्टारंट सप्टेंबरनंतरच सुरु करणार आहोत. कोरोनाची भीती आहे. पावसाळ्यात कोरोना रुग्ण दगावत आहे, त्यामुळे कुणीही हॉटेल मालक व्यवसाय पावसाळ्यात सुरु करायला तयार नाहीत. हॉटेल व्यवसायांत कर्मचारी ७५ टक्के बाहेरचे बंगाल, ओरिसा, नेपाल या भागातील आहेत. आता हॉटेल्स सुरु केली तर गोवेकाराना नोकऱ्याच्या संधी जास्त आहेत.

भविष्यात इंग्लड देशातील गेस्ट येथे येऊ शकतात. हे पर्यटक शिस्तीचे आणि प्रामाणिक असतात , ते चोऱ्यात किंवा ड्रग्समध्ये सामील नसतात . आता जे हॉटेल कर्मचाऱ्या मार्फत महिन्याला २० कोटी पगार बाहेरच्या कामगाराना जात होता, ती सुवर्णसंधी आता गोवेकरांना मिळणार असल्याचा विश्वास सूरज नाईक यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या