मांद्रेत दुकानाला आग; दहा लाखांचे नुकसान

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

आगीत दोन डीप फ्रीज, दोन फ्रिज, किराणा मालाच्या वस्तू, भेट वस्तू, लहान मोठी भांडी, संगणक व प्रिंटर, घराच्या आतील व बाहेरील फॉल सिलिंग रुम, घरातील विविध प्रकारचे साहित्‍य यासह अन्‍य वस्तू जळून खाक झाल्‍या. 

पेडणे: देऊळवाडा मांद्रे येथे मंगळवारी पहाटे ५.१५ वा.च्‍या सुमारास अंजली संजय मांद्रेकर यांच्या मालकीच्या दुकानाला व घराला आग लागल्याने सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. अग्‍निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी त्‍वरित धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. आगीत दोन डीप फ्रीज, दोन फ्रिज, किराणा मालाच्या वस्तू, भेट वस्तू, लहान मोठी भांडी, संगणक व प्रिंटर, घराच्या आतील व बाहेरील फॉल सिलिंग रुम, घरातील विविध प्रकारचे साहित्‍य यासह अन्‍य वस्तू जळून खाक झाल्‍या. 

पेडणे अग्‍निशामक दलाने सुमारे दहा लाख रुपयांची मालमत्ता वाचविली. अग्‍निशामक दलाचे अधिकारी दिलीप गावस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्‍यक अधिकारी जयराम मळीक, प्रमोद गवंडी, विकास चौहान, लक्षदीप हरमलकर, राजेश परब यांनी मोलाची कामगिरी बजावली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या