केप्यात घरोघरी घरपट्टी संकलन

quepe house tax collection
quepe house tax collection

पणजी

केपे नगरपालिका क्षेत्रात घरोघरी जाऊन घरपट्टी गोळा करण्यासाठीच्या योजनेचा आज उपमुख्यमंत्री चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांच्या हस्ते सुरवात करण्यात आली. ही घरपट्टी गोळा करण्यासाठी राज्य शहरी विकास प्राधिकरण व एक्सीस बँकेतर्फे अद्यावत पॉईंट ऑफ सेल मशीनचा वापर करण्यात येणार आहे. 
टाळेबंदीच्या काळात घरभाडे गोळा करण्यासाठी नगरपालिकेत लोकांनी गर्दी करू नये यासाठी या अभिनव योजनेचा अवलंब करण्यात येणार असल्याचे कवळेकर यांनी यावेळी सांगितले. घरपट्टी भरण्यासाठी यामुळे जनतेला सहजता होणार आहे. तसेच नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यात ह्यामुळे मदत होणार आहे, असेही ते म्हणाले. यावेळी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, केपेचे नगराध्यक्ष दयेश नाईक, नगरसेवक व राज्य शहरी विकास प्राधिकरणाचे अधिकारी हुसेन मुजावर, एक्सीस बँकेचे अधिकारी, आदी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com