पेडणेकरांना वीज,रस्ते,पाणी दिले मग बाबू आजगावकर करोडपती कसे झाले ; रंगनाथ कलशावकर

आपल्या भावाला महामंडळाचे चेरमेन केले, त्याच्या जागी पेडणेकर दिसले नाही का ?
Mission for Local Meetings
Mission for Local MeetingsDainik Gomantak

पेडणेकरांचे प्रश्न आणि समस्या फक्त या भूमित जन्मलेले पेडणेकरच सोडवू शकतात, त्यासाठी विधान सभेत पेडणेकर हेच विधान सभेत आमदार म्हणुन जाण्याची गरज असून राजन कोरगावकर हेच एकमेव उमेदवार आणि आमदार बनण्याची क्षमता आहे त्यांनाच विजयी करण्याचे आवाहन कोरगाव जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर (Ranganath Kalshavkar) यांनी एब्राम्पुरकर येथे मिशन फॉर लोकलच्या सभेत (Mission for Local Meetings) केले.

बाबू करोडपती कसे झाले?

जिल्हा सदस्य रंगनाथ कलशावकर यांनी बोलताना प्रत्येकवेळी उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) बाबू आजगावकर (Babu Azgavkar) हे आपण पेडणेत (Pernem) वीज पाणी रस्त्ये दिल्याचे सांगतात तर मग ते पेडणेकरांच्या जीवावर कसे करोडपती झाले.

Mission for Local Meetings
कामगार सेनेच्या आंदोलनामुळे दाबोळी विमानतळावर प्रवाशांचे हाल

पेडणेकर चेरमेन मिळाला नाही का?

बाबू आजगावकर यांनी २० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत केवळ आपला आणि स्वतःच्या परीवाराचा विकास केला आणि आपल्या भावाला महामंडळाचे चेरमेन केले, त्याच्या जागी पेडणेकर दिसले नाही का ? असा सवाल उपस्थित करून आता सर्व पेडणेकरांनी या भूमितला आमदार निवडून आणण्याचे आवाहन केले.

इम्ब्राम्पूर येथे आयोजित केलेल्या सभेला मिशन फॉर लोकलचे (Mission for Local Meetings) तथा उमेदवार राजन कोरगावकर, महिला अध्यक्ष रश्मी (Female president) कोरगावकर, कोरगाव पंच अब्दुल नाईक, पंच कुस्तान कुयेलो, पंच महादेव पालयेकर, माजी सरपंच राजू नर्से, प्रशांत गावडे, दाजी कासकर, मधु पालयेकर, गुंडू राऊळ, लीना शेटकर, रुपेश परब, गजानन गडेकर, आशिष गवस, प्रीतम कलंगुटकर, परेश पालव आदी उपस्थित होते.

राजन कोरगावकर

राजन कोरगावकर यांनी बोलताना ज्या वेळी पेडणेकर विधानसभेत जाणार त्याच वेळी किमान सातवी शिकलेल्या युवकाला सुधा सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी कायदा करण्यात येईल, जे प्रकल्प मतदार संघात होवू घातलेले आहेत त्यात पेडणेकरांनाच रोजगार मिळवून देण्यासाठी संघटीत होवुया असे आवाहन केले. पेडणे तालुका हा कलाकारांची खाण म्हणून ओळखला जातो. त्या ठिकाणी आजपर्यंत ज्यांनी २० वर्षे मंत्रिपद भोगले त्याला कला भवन उभारता आले नाही तो पुढील पाच वर्षात आश्वासना पलीकडे काहीच करू शकत नाही असा दावा राजन कोरगावकर यांनी केला .

Mission for Local Meetings
१० टक्क्यांपेक्षा कमी खासगी बसेस रस्त्यावर; ग्रामीण भागात प्रवाशांचे होताहेत हाल

प्रशांत गावडे

प्रशांत गावडे यांनी बोलताना राजन कोरगावकर हे याच भूमीतील स्थानिक आणि कोरगावचे रहिवासी आहेत ते बाहेरचे नाही, आमचे भारतीय विदेशात, अमेरिकेत राहतात त्यामुळे ते तिथले होतात का ते भारतीय गोवेकरच असतात असे सांगून कामानिमित्ताने राजन कोरगावकर हे मडगावला (Margao) गेले त्यामुळे ते मडगावकर बनत नसल्याचे सांगून कोणी धारगळ येथे घर बांधले म्हणून ते स्थानिक होत नाही ते म्हपसेकरच आहेत असा दावा प्रशांत गावडे यांनी केला .

माजी सरपंच राजू नर्से यांनी बोलताना पेडणेकरांची दुःख जाणारा आणि त्यांचे अश्रू पुसणारा पेडणेकरच असणार आहे त्यासाठी आता केवळ पेडणेकरच आमदार असावा त्यासाठी संघटीत होवून राजन कोरगावकर साठी काम करुया असे आवाहन करून बाबू आजगावकर यांची हुकुमशाही संपुष्ठात आणण्यासाठी परत एकदा पेडणेकरांनी ठरवले तर शक्य असल्याचा विश्वास व्यक्त केला.

कोरगाचे पंच अब्दुल नाईक यांनी बोलताना ही योग्य वेळ आहे बाबू आजगावकर यांना मडगावला पाठवण्याची. भूमिपुत्राची समस्या जाणू शकतो, बाबू आजगावकर यांनी मतदार संघात काहीच केले नाही पेडणे बसस्थानक आणि संत सोहिरोबानाथ अंबिये कोलेज राजेंद्र आर्लेकर यांनी आणली, आयुष हॉस्पिटल हे श्रीपाद नाईक यांनी आणले, सावळ वाडा मैदान ही राजेंद्र आर्लेकर यांची योजना मोपा विमानतळ हा राष्ट्रीय प्रकल्प. माग बाबू ने काय केले असा सवाल उपस्थित केला. यावेळी दाजी कासकर यांनी राजन कोरगावकर काय करणार यावर एक सुंदर कविता सादर केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com