COVID-19 Goa: इव्हर्मेक्टिन कोविडमध्ये किती प्रभावी?

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 12 मे 2021

गोव्याने 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व रहिवाशांना इव्हर्मेक्टिन औषध घेण्याचा सल्ला दिला आहे. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी 10 मे रोजी सांगितले की मृत्यू दर कमी करण्यासाठी हे औषध प्रत्येकाला दिले जाईल.

पणजी: गोव्याने(GOA) 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व रहिवाशांना इव्हर्मेक्टिन(Ivermectin) औषध घेण्याचा सल्ला दिला आहे. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे(Vishavajit Rane) यांनी 10 मे रोजी सांगितले की मृत्यू दर कमी करण्यासाठी हे औषध प्रत्येकाला दिले जाईल. गोव्यात आता कोणीही हे एंटी-पैरासिटिक औषध घेऊ शकते. यासाठी कोरोनाची(Covid-19) लक्षणे असणे आवश्यक नाही.(How effective is the Ivermectin tablets given in Goa in Covid19)

अमेरिकेच्या औषध नियामक एफडीएने(FDA) इव्हर्मेक्टिन ला मान्यता दिली नाही. गोव्याचे आरोग्यममत्री विश्वजीत राणे म्हणतात की, "यूके, इटली, स्पेन आणि जपानमधील तज्ज्ञ पॅनल्सना असे आढळले आहे की या औषधाने कोविड रूग्णांमधील मृत्यू दर रिकवरी टाइम आणि व्हायरल क्लीयरन्स कमी होतो. इव्हरमेक्टिन 12mg रुग्णांना पाच दिवस दिले जाईल. हा आजार टाळण्यासाठी मी इव्हर्मेक्टिन देण्याच्या सूचना रोज्यातील जनतेला दिल्या आहे. या उपचारांमुळे कोविड संसर्ग रोखला जाणार नाही परंतु कोरोनाची तीव्रता कमी होण्यास मदत होईल.इव्हर्मेक्टिन 12MG टॅबलेट प्रत्येक जिल्हा, तालुका, पीएचसी, सीएचसी, ग्रामीण दवाखान्यांमध्ये उपलब्ध करुन देण्यात य़ेणार आहे, जेणेकरून लोक  लवकरच उपचार सुरू करू शकतील."

Goa Medical College: ऑक्सिजनच्या कमतरतेमूळे 75 रुग्णांचा मृत्यू 

कोविड संक्रमणाचा धोका ड्रगमुळे कमी होतो?
गोव्यात इव्हर्मेक्टिनच्या मंजुरी नंतर हे औषध चर्चेत आले आहे. आता याबद्दल एक अभ्यास पुढे आला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की या औषधाचा वारंवार वापर केल्याने कोविड संसर्गाचा धोका कमी होतो.

अमेरिकन जर्नल ऑफ थेरेपीटिक्सच्या मे-जूनच्या आवृत्तीत प्रकाशित झालेल्या संशोधनात क्लिनिकल, इन-विट्रो, एनिमल आणि वास्तविक-जगातील अभ्यासांमधील डेटाचे मूल्यांकन केले गेले आहे. इव्हर्मेक्टिनच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी तीन आरसीटी आणि पाच नियंत्रित चाचण्यांचे पुनरावलोकन केले गेले. संशोधकांनी कोविड रुग्णांमध्ये मृत्यु दर, रिकवरी टाइम आणि व्हायरल क्लीयरन्स वेळ कमी झाल्याचे नमूद केले आहे. 

गोव्यातील नागरिकांनो सावधान! इव्हर्मेक्टिन औषध न घेण्याचा WHO चा सल्ला 

इव्हर्मेक्टिन बाबत शास्त्रीय पुरावे नाहीत.

4 फेब्रुवारी, 2021 रोजी, इव्हर्मेक्टिन बनविणारी फार्मा कंपनी मर्क यांनी एक निवेदन जारी केले आणि कोविडच्या उपचारात या औषधाच्या प्रभावीतेबद्दल स्पष्टीकरण दिले. कंपनीने असे म्हटले होते की 'कोविड विरूद्ध औषधाचा काय परिणाम होईल याचे शास्त्रीय पुरावे नाहीत. हे औषध कोविड रूग्णांमध्ये वैद्यकीयदृष्ट्या प्रभावी आहे याचा पुरावा नाही.  

काय म्हणाले WHO चे तज्ञ?
कंपनीशिवाय जगातील अव्वल आरोग्य तज्ञ आणि वैज्ञानिकही कोविडच्या उपचारात या औषधाच्या वापरावर प्रश्न विचारत आहेत. डब्ल्यूएचओच्या टॉप साइंटिस्ट सौम्या स्वामीनाथन यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, 'डब्ल्यूएचओ क्लिनिकल ट्रायल्सशिवाय कोविडमध्ये इव्हर्मेक्टिन वापरण्याची शिफारस करत नाही'.स्वामीनाथन यांनी ट्वीट केले की, "औषधाच्या वापरासाठी सुरक्षा आणि कार्यक्षमता खूप महत्वाची आहे." 

संबंधित बातम्या