कुंकळ्ळीला एनआयटीचा किती फायदा?

How much does NIT benefit Kunkalli
How much does NIT benefit Kunkalli

कुंकळ्ळी : मेळावलीला आयआयटी स्थापन झाल्यास गावचा कायापालट होणार.विकासाची गंगा गावात येणार.गावचे नाव राष्ट्रीय नकाशावर येणार.गावच्या तरुणांना नोक-या मिळणार.मेळावलीच नव्हे तर सत्तरी शैक्षणिक हब बनणार असा दावा सरकारतर्फे केला जात आहे.मात्र खरेच आयआयटी आली तर सरकार सांगतात त्या प्रमाणे चमत्कार होणार का?
कुंकळ्ळीला एनआयटी उभी राहत आहे अशीच आश्वासने कुंकळ्ळीकरांना दिली होती.नोक-या मिळणार, काम मिळणार, रोजगार प्राप्त होणार.

स्थानिक शिक्षण सस्थाचा विकास होणार.स्थानिकांना एनआयटीत शिक्षणासाठी जागा मिळणार अनेक आश्वासनाची बरसात करण्यात आली होती.स्थानिकांनी नियोजित एनआयटीला विरोधही केला होता मात्र भाजपा सरकारने येथील काही स्थानिकाच्या सहयोगाने लोक विरोधाची पर्वा न करता साडे चार लाख चौ.मी.जागा संपादन करून आता सरकार यासाठी पहिल्या टप्यात तीनशे कोटी खर्च करणार आहे.मात्र एनआयतीचा स्थानिक फायदा झाला का?पुढे फायदा होणार का?कुंकळ्ळी एनआयटीमुळे राष्ट्रीय नकाशावर जाणार का? कुंकळ्ळीचा शैक्षणिक हब बनण्याचा मार्ग मोकळा झाला का?स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला का?रोजगार व नोक-या मिळणार का? या सर्व प्रश्ननाची उत्तरे नकारार्थी असून स्थानिकांचा हिरमोड झाला आहे हे मात्र सत्य. एनआयटीचा स्थानिकांना चिमुटभरही फायदा नसल्याचे सत्य आता लोकांना उमजले आहे.एनआयटी चा फायदा झाला एका नगरसेवकाला ज्याने माजी आमदार राजन नाईक यांना हाताशी धरून एनआयटी शेजारी असलेल्या आपल्या जमिनीला भाव मिळविण्यासाठी एनआयटीला पाठींबा दिला होता.एनआयटीमुळे येथील एक वृद्ध कारागीर भिको चारी ज्यांनी सदर जागेवर  स्वर्ग फुलविला होता त्याला बेघर व्हावे लागले.एनआयटी व सरकारकडून जमीन व घरे गेलेल्याना नुकसान भरपाई ही मिळाली नाही.


ज्या जागेवर स्थानिक विरुगल्यासाठी वापर करीत होते त्या जागेवर भलेमोठे उंच कुंपण उभे राहिलेले आहे आता कुकल्लीकराची जमीन कुकळलीकरायसाठी परकी ठरली आहे.सध्या कुपण उभारणीचे काम व बांधकाम सुरू झालेले असून बांधकाम करणारे कंत्राटदार व काम करणारे कामगार व कर्मचारी परप्रांतीय आहेत मग स्थानिकांना रोजगार मिळणार हे आश्वासन हवेतच विरले असे म्हणावे लागेल.स्थानिकाना एनआयटीत नोक-या मिळणार हा दावाच हास्यास्पद आहे.शिक्षकांच्या जागा व इतर जागा राष्ट्रीत पातळीवर खास परीक्षा घेऊन भरल्या जातात शिवाय या कामासाठी स्थानिक पात्र आहेत का? मग स्थानिकांना कोणत्या नोक-या मिळणार सफाई कर्मचारी की एमटीएसच्या.


स्थानिक विद्यार्थ्याना गुणवत्ते शिवाय व पात्रतेशीवाय एनआयटीत जागा मिळणे शक्य नाही.स्थानिक शिक्षण सस्थाचा याचा कोणताच फायदा नाही आता एनआयटी परिसरात केंद्रीय शाळा उभी राहिल्यास त्याचा विपरीत परिणाम स्थानिक शाळांवर होण्याचा धोका आहे.सरकारने स्थानिकांची साडे चार लाख चौ. मी.जागा घेऊन करोडो रुपये खर्चून भव्य दिव्य एनआयटी कॉम्प्लेक्स उभा राहणार तर दुस-या बाजूने स्थानिक शिक्षण संस्थाचे हाल व स्थिती दयनीय झाली आहे.योग्य जागा नसल्यामुळे विद्यार्थ्याचे हाल होत आहेत अशानेच बनणार आहे का कुंकळ्ळी शैक्षणिक हब?
 असा प्रश्न स्थानिक लोकांना पडला आहे.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com