Biporjoy Cyclone: बिपरजॉय वादळाचा गोव्याला किती धोका? जाणून घ्या, काय होणार परिणाम...

गोवा, महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टीवर पावसाचा यलो अलर्ट
Cyclone File Photo
Cyclone File PhotoDainik Gomantak

Biporjoy Cyclone: अरबी समुद्रात मंगळवारी रात्री तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर वादळात झाले आहे. बांग्लादेशने या वादळाला बिपरजॉय असे नाव दिले आहे. दरम्यान, या वादळाचा देशाच्या पश्चिम किनारपट्टीला धोका नाही, असे पुणे वेधशाळेने म्हटले आहे.

तथापि, गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टीवर जोरदार वारे वाहतील. तसेच या किनारपट्टीवरील समुद्रही खवळलेला असेल. ६ जूनपासून त्याचे परिणाम जाणवायला सुरवात झाली आहे. ८ ते १० जून पर्यंत समुद्र खवळलेला असणार आहे.

किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याची सूचना करण्यात आली आहे.

Cyclone File Photo
Goa Petrol-Diesel Price: उत्तर गोवा, पणजीमध्ये दरवाढ, दक्षिण गोव्यात दर स्थिर; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलच्या आजच्या किमती

बिपरजॉय हे नाव बांग्लादेशने दिले आहे. हे वादळ उत्तरेच्या दिशेने सरकत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीला वादळाचा फार धोका नाही, असे पुणे वेधशाळेने म्हटले आहे. उत्तरेकडे जात हे वादळ ओमानच्या किनारपट्टीकडे जाईल.

दरम्यान, या वादळामुळे मॉन्सूनवर परिणाम झाला आहे. एरवी, एक जूनला मॉन्सून केरळमध्ये दाखल होतो, पण अद्याप केरळमध्ये पावसाला सुरवात झालेली नाही. आयएमडीने ४ जूनला मॉन्सून केरळमध्ये दाखल होईल, असे सांगितले होते, पण तोदेखील अंदाज चुकला आहे.

दरम्यान, गोवा, महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टीवर आयएमडीने पावसाचा यलो अलर्ट वर्तवला आहे. आगामी चार दिवसांमध्ये कोकण आणि गोवा किनारपट्टीवर तसेच मध्य महाराष्ट्रात पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com