लोहमार्ग दुपदरीकरण प्रकरणावरून गोवा विधानसभेत विरोधक आक्रमक

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 24 मार्च 2021

लोहमार्ग दुपदरीत करण्यासाठी सरकारकडून किती भूसंपादन केले जाणार आहे या माहितीवर अर्धा तास चर्चा करावी यासाठी गोवा विधानसभेत आज विरोधी आमदार आक्रमक झाले.

पणजी: लोहमार्ग दुपदरीत करण्यासाठी सरकारकडून किती भूसंपादन केले जाणार आहे या माहितीवर अर्धा तास चर्चा करावी यासाठी गोवा विधानसभेत आज विरोधी आमदार आक्रमक झाले. सरकारची या विषयावर चर्चा करण्याची तयारी नसल्याने त्यांनी सभापतींना समोरील हौद्यात धाव घेतली. यामुळे सभापतीनी पंधरा मिनिटांसाठी विधानसभा कामकाज तहकूब करावे लागले आहे.

गोव्यात ऑलेक्ट्राची इलेक्ट्रिक बस सेवा सुरू

भाजपच्या आमदार एलिना साल्ढाणा यांनी प्रश्‍नोत्तराच्या तासाला याविषयी प्रश्न विचारला होता मात्र प्रश्‍नोत्तरे सुरू असतानाच प्रश्नोत्तर तास संपल्याने सभापती राजेश पाटणेकर यांनी पुढील कामकाज पुकारले. मात्र साल्ढाणा यांनी पुढे बोलणे सुरू ठेवले याच दरम्यान विरोधी आमदार उठले आणि त्यांनी या विषयावर अर्धा तास चर्चा करा अशी मागणी केली. सभापतींनी ती मागणी मान्य केली नाही. त्यामुळे विरोधी आमदारांनी सभापती समोरील हौद्यात धाव घेतली त्यामुळे सभापतींना आता पंधरा मिनिटांसाठी कामकाज तहकूब करावे लागले आहे.

बुकिंग डेस्टिनेशन म्हणून गोवा पर्यटनास सर्वाधिक पसंती 

संबंधित बातम्या