अजून किती अकार्यक्षमता लपवणार: आम आदमी पक्षा

प्रतिनिधी
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

आम आदमी पक्षाचे गोम्स यांची सरकारला विचारणा

पणजी: सरकारी कर्मचारी आणि कोरोना वॉरियर्स यांना चूप करणे हा एक मोठा अपमान आहे. राज्य सरकार आपली अकार्यक्षमता लपवण्यासाठी किती खाली जाईल? अशी विचारणा आम आदमी पक्षाचे राज्य समन्वयक एल्विस गोम्स यांनी केली आहे.

दक्षता संचालक संजीव गावस देसाई यांनी राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांना सरकार विरूद्ध आंदोलन किंवा याचिकेत भाग घेण्यासंबंधी इशारा दिला. राज्य सरकारची ही कृती प्रभावीपणे केलेली गंभीर कारवाई आहे जी सरकारी कर्मचार्‍यांच्या अगोदरच झालेल्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी आहे. या सरकारी कर्मचा-यापैकी बरेच जण फ्रंटलाइन कोरोना वॉरियर्स आहेत. यापैकी बर्‍याच जणांना त्यांच्या 
आर्थिक आणि शारीरिक सुरक्षिततेबद्दल चिंता आहेत असे त्यांनी नमूद केले होते.

हल्लीच राज्य सचिवालयातील कर्मचाऱ्यांनी कोरोनाची वाढती प्रकरणे लक्षात घेऊन त्यांच्यासाठी अपु-या सुरक्षा खबरदारीचा निषेध करण्यासाठी त्यांचे काम थोड्या वेळासाठी थांबवले होते.गोवा बँक एम्प्लॉईज असोसिएशनने (जीबीईए) देखील सुरक्षित कामाच्या जागेसाठी,अशाच मागण्यांसाठी निषेध नोंदविला होता. राज्य सरकार देखील विशेषत: हाऊस बिल्डिंग अ‍ॅडव्हान्स (एचबीए) निकषांमधील बदलाच्या विरोधात केलेल्या याचिकांमुळे गोंधळलेली दिसते. सरकारला असे वाटते की वैयक्तिक सुरक्षिततेसाठी विनवणी करणे ही एक आक्षेपार्ह क्रिया आहे? किंवा सेन्सॉरशिपद्वारे ते त्यांच्या अपयशांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
आम्ही या आदेशाचा तीव्र निषेध करतो. हे खेदजनक आहे की सावंत सरकार पुन्हा एकदा आपले अपयश लपविण्याचा प्रयत्न करीत आहे आणि यावेळी हे साधन सरकारी कर्मचाऱ्यांचे सेन्सॉरशिप आहे ज्यांपैकी बरेच जण कोरोना वॉरियर्स आहेत असेही गोम्स यांनी नमूद केले आहे.

संबंधित बातम्या